देवगड नगरपंचायत ही पैसे छापण्याचा कारखाना ; सत्ताधारी भाजपा नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी गंभीर आरोप करीत दिला सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर

  नगरपंचायत प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी पैशांची उधळण ; चक्क ९७ लाख रूपये टाकले खर्ची   देवगड : चक्क सर्वसाधारण सभेतच देवगड जामसंडे नगरपंचायत म्हणजे पैसे छापण्याचा कारखाना असा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपचे नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी करून सत्ताधारकांना घरचा आहेर दिला.पुलाच्या निकृष्ट बांधकामावरून प्रशासनाला धारेवर धरत कावले यांनी हा गंभीर आरोप केल्याने नगरपंचायतीची सभा ही […]

तिर्लोट ठाकूरवाडीतील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

  नामदार नितेश राणे यांचा उबाठाला राजकीय दणका देवगड : तिर्लोट ठाकूरवाडी येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंदर विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश उबाठा सेनेला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला मोठा राजकीय दणका मानला जात आहे. […]

मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात तुळशी विवाह सोहळा उत्साहात संपन्न

देवगड (प्रतिनिधी)   मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने तुळशी विवाहाचा वार्षिक उत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार, पूजन विधी आणि मंगलाष्टकांच्या गजरात हा सोहळा संपन्न झाला. श्री देव रामेश्वर मंदिराचा वार्षिक उत्सवानुसार तुळशी विवाह सोहळा आज दिमाखात संपन्न झाला. पूर्व पारंपारिक रितीरिवाद्यानुसार खंडित झालेल्या वार्षिक उत्सवाची रीत […]

मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात ३०० वर्षांनंतर होणार त्रिपुरारी पौर्णिमा यात्रौत्सव !

दीपोत्सव सोहळा व वारकरी दिंडीचे असणार खास आकर्षण देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील मिठबाव, तांबळडेग,कातवण या तीन गावचे ग्रामदैवत असलेल्या मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात सुमारे ३०० वर्षांनी बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री देव रामेश्वर मंदिरात भव्य व दिमाखदार त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सव सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने आयोजित दीपोत्सवामुळे मंदिर परिसर हजारो […]

देवगड तालुक्यात निवडणुकीची धामधूम : शिरगाव जिल्हा परिषदेसाठी अजित कांबळेंचा दावा बुलंद

  देवगड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तालुक्यात धामधूम सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांच्या युतीमुळे कोकणात मैत्रीपूर्ण लढती दिसतील, अशी परिस्थिती आहे. दरम्यान, आरक्षण सोडती नंतर अनेक इच्छुकांची समीकरणे बदलली असून, काही मतदारसंघांत उमेदवारांच्या ‘आयात-निर्यात’ चे राजकारणही पाहायला मिळत आहे.   देवगड तालुक्यातील ७ जिल्हा […]

पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यासाठी ग्रामपंचायत कुणकेश्वरतर्फे रांगोळी व कंदील स्पर्धा

देवगड (हेमंत पेडणेकर) पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यासाठी ग्रामपंचायत कुणकेश्वरतर्फे रांगोळी व कंदील स्पर्धा   २० ते २७ आकाशकंदील तर २२ ऑक्टोबर रोजी रांगोळी स्पर्धा   माझी वसुंधरा अभियान 6.0 तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कुणकेश्वरतर्फे गावमर्यादीत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या उद्देशाने दोन विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांद्वारे गावकऱ्यांना सृजनशीलतेसोबतच पर्यावरण […]

मिठबावमध्ये ‘शिंदे सेनेची दिवाळी भेट’ ! गावात सुगंधी उटणे, फराळ व भेटवस्तूंचे वाटप

मिठबावमध्ये ‘शिंदे सेनेची दिवाळी भेट’ ! गावात सुगंधी उटणे, फराळ व भेटवस्तूंचे वाटप     मिठबाव : या वर्षीची दिवाळी मिठबाव गावात खास ठरणार आहे. हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या ब्रीदवाक्याप्रमाणे गुरुवर्य आनंद दिघे यांच्या विचारधारेनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने आणि आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून शिंदे […]

“रामेश्वर तुझा महिमा अघात ! मिठबावमध्ये सुमारे ३०० वर्षांनी अनुभवला शिवलग्न व सोनेलुटीचा सोहळा”

देवगड (प्रतिनिधी)   “रामेश्वर तुझा महिमा अघात ! मिठबावमध्ये सुमारे ३०० वर्षांनी अनुभवला शिवलग्न व सोनेलुटीचा सोहळा”     मिठबाव श्री देव रामेश्वराचा विजयादशमी उत्सव दिमाखात संपन्न     शिवलग्न व शिवकळे सोबत सोने लुटण्याचा दिव्य सोहळा पाहताना गाव उपस्थित रयतेचे उर भरून आले.याला निमित्त होते विजयादशमीच्या उत्सवाचं. सुमारे ३०० वर्षानंतर हा नयनरम्य सोहळा याची […]

वादळी वातावरण व अतिवृष्टीने शेकडो नौका देवगड बंदरात ;  यामध्ये गुजरातमधील नौकांचा समावेश

  देवगड : प्रतिनिधी     वादळसदृश वातावरणाचा फटका मच्छिमारी व्यवसायाला बसला असून हवामान विभागाने समुद्रात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून अतिवृष्टीची शक्यता ओहे यामुळे मच्छिमारीसाठी जावू नये असा इशारा दिल्यानंतर स्थानिक नौकांबरोबरच गुजरात, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला मधील शेकडो नौका देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.     किनारपट्टी भागात २८ […]

कोकणात प्रथमच सापडले लज्जागौरीचे कातळचित्र

देवगड (प्रतिनिधी)   देवगड तालुक्यातील वळीवंडे गावाच्या जांभ्या कातळ सड्यावर लज्यागौरीचे कातळचित्र आढळल्याचे वृत्त कोकण इतिहास परीषद व देवगड इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातुन पुढे आले आहे. गेली अनेक वर्षे या दोन्ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातळचित्र संशोधन व संवर्धनाचे काम करीत आहेत. आजवर लज्जागौरी सदृश्य पेट्रोग्लिफ सापडल्याच्या बातम्या फोटोंसह झळकल्या होत्या. पण ही चित्रे भौमितिक व […]