मिठबावमध्ये ‘शिंदे सेनेची दिवाळी भेट’ ! गावात सुगंधी उटणे, फराळ व भेटवस्तूंचे वाटप
मिठबाव : या वर्षीची दिवाळी मिठबाव गावात खास ठरणार आहे. हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या ब्रीदवाक्याप्रमाणे गुरुवर्य आनंद दिघे यांच्या विचारधारेनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने आणि आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून शिंदे सेना तर्फे मिठबाव गावात दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणारा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत शिवसेना तालुकाप्रमुख अमोल लोके आणि ग्रामपंचायत सदस्य सौ अक्षया लोके यांच्या वतीने संपूर्ण मिठबाव गावात प्रत्येक घरापर्यंत मोती साबण, सुगंधी उटणे, दिवाळी फराळ व फ्रूट खंड यांचे वाटप करण्यात येणार आले.तसेच कुणकेश्वर पंचायत समिती मतदार संघात मोती साबण व उटणे वाटप करण्यात आले.
गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत सणाचा सुगंध आणि आनंद पोहोचावा, एकात्मता आणि स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे अमोल लोके यांनी सांगितले.
दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण असून, “गावातील प्रत्येक कुटुंबाचा दिवा तेजोमय व्हावा” या हेतूने शिंदे सेनेतर्फे या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.गावात या बातमीने आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र “शिंदे सेनेची दिवाळी भेट” हा चर्चेचा विषय ठरला आहे.
