कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर परिसरात एका कातकरी मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. यात कातकरी मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बाजारपेठेतून पटकीदेवी मंदिर मार्गे बांधकरवाडीच्या दिशेने जात असताना कातकरी मुलाचा आणि दोघांचा वाद झाला. यात कातकरी मुलाच्या हातात असलेला कोयता घेऊन त्याच्यावर डोक्यावर तीन ते चार ठिकाणी वार करण्यात आले. यात हा मुलगा गंभीर जखमी झाला. स्थानिकांना ही घटना कळताच त्यांनी तातडीने जखमी मुलाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
