काही निवडणूका जिंकण्यापेक्षा लढण्यासाठी असतात आणि आपल्या लढवय्या उमेदवारांनी निवडणूक लढण्याची हिंम्मत दाखवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन – वैभव नाईक

  एकाच घरात पालकमंत्री, सत्ताधारी खासदार,आमदार असताना जिल्ह्यातील प्रश्न का सुटत नाहीत? -परशुराम उपरकर   कणकवली (प्रतिनिधी)   सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जि.प. पं.स. निवडणुकीत २५ सीट बिनविरोध झाल्या.आपल्या मतदारसंघातील उमेदवारांनाही लाखो रुपयांचे आमिष देऊन त्यांना फोडण्याचे आणि दडपण्याचे प्रयत्न झाले परंतु आपले सर्वजण शिवसेना पक्षाशी प्रामाणिक राहिले. काही निवडणूका जिंकण्यापेक्षा लढण्यासाठी असतात आणि आपल्या […]

कणकवलीत भटक्‍या कुत्र्यांची पकड मोहीम सुरू ; नगरपंचायतीकडून एजन्सीची नियुक्‍ती : निर्बिजीकरण झाल्‍यानंतर पुन्हा मूळ ठिकाणी सोडणार

कणकवली (प्रतिनिधी) कणकवली शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून भटके कुत्रे पकड मोहीम आजपासून सुरू करण्यात आली. आज (ता.२७) नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. पकडलेल्‍या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाणार आहे. त्‍यानंतर ज्या ठिकाणाहून हे कुत्रे आणले त्‍याच ठिकाणी ते परत आणून सोडले जाणार असल्‍याची माहिती कुत्र्यांची निर्बिजीकरण करण्याचा ठेका […]

कणकवली नगरपंचायत चा पुढील 20 वर्षांचा विकास आराखडा प्रसिद्ध ; सूचना व हरकती दाखल करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी

  कणकवली (प्रतिनिधी)   कणकवली नगरपंचायतचा पुढील २९ वर्षांचा विकास आराखडा कणकवली नगरपंचायत मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रारूप आराखड्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. सूचना व हरकती सादर करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या आराखड्याच्या प्रस्तावित आरक्षणाच्या मुद्द्यावरून येत्या काळात कणकवली शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.   तसेच काही […]

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करणार हि पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणाच ठरली – परशुराम उपरकर

कणकवली (प्रतिनिधी)   जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या घोषणा केल्या होत्या. त्यावेळी पोलीस यंत्रणेला धारेवर धरत कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात पोलीस यंत्रणेने त्या आदेशांना केराची टोपली दाखवली, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना […]

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी ; आढावा बैठकीत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्र किनारी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामास तातडीने गती देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.   मंत्रालयात याबाबत पार पडलेल्या आढावा बैठकीत आयटी विभागाचे विरेंद्र सिंग तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे उपस्थित […]

नियंत्रण सुटल्याने रोलर दहा फूट खोल दरीत; घरासमोर अपघात ; तारामुंबरीत सुदैवाने जीवितहानी टळली, चालकाने उडी मारून वाचविले प्राण

देवगड : प्रतिनिधी   तारामुंबरी येथील रस्त्याचे काम सुरू असताना चढ रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने रोलर न्युटड्ढल होवून मागे येत रस्त्यानजिक सुमारे १० फुट खोल भागात कलंडून तेथिल एका घरासमोर अपघातग्रस्त झाला.सुदैवाने घराच्या अंगणात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.तर चालकाने प्रसंगावधान राखून रोलरमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला.ही घटना बुधवारी दुपारी २.३० वा.सुमारास घडली.   घटनास्थळावरून […]

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच’ सिंधुदुर्गने मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

‘ शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत पटसंख्या व अतिरिक्त शिक्षक धोरणात बदल करण्यासंदर्भात मंत्री राणे यांनी मांडली होती महत्वपूर्ण भूमिका   मुंबई (प्रतिनिधी) कोकणातील मराठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा वाचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील भौगोलिक स्थितीचे महत्त्वपूर्ण मुद्दे मांडून पटसंख्या व अतिरिक्त […]

खा. नारायण राणे यांची सतीश सावंत यांनी घेतली भेट

  मुंबई (प्रतिनिधी) भाजप नेते खा.नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी बुधवारी मुंबई जूहू येथील अधिश निवासस्थानी भेट घेतली. खा. राणेंच्या प्रकृती गेले काही दिवस ठिक नव्हती. मुंबई येथे जावून सतीश सावंत यांनी खा. राणे यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी सौ.निलम राणे याही उपस्थित होत्या.   सिंधुदुर्गात नुकत्याच […]

कट्टा महाविद्यालयातर्फे आयोजित टाकाऊतून टिकाऊ वस्तु निर्मिती उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची सृजनशीलता व पर्यावरण पूरकतेचा सुंदर संगम

  मालवण (प्रतिनिधी)   टाकाऊतून टिकाऊ वस्तु निर्मिती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढीस लागून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व कौशल्याला चालना मिळते. तसेच कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देऊन जुन्या वस्तू फेकून न देता त्यांचा पुनर्वापर कसा करता येईल याचेही ज्ञान अशा उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयात केल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळते असे प्रतिपादन वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा चे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक […]

आचिर्णे येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पीटल सांगुळवाडीचे आरोग्य शिबीर संपन्न

  वैभववाडी ( प्रतिनिधी) आचिर्णे येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पीटल सांगुळवाडी चे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले . या आरोग्य शिबिराचा आचिर्णे गावातील ( ४०) लोकांनी लाभ घेतला . या शिबिरात लोकांना ब्लड प्रेशर, सुगर , व इतर आजारांवर उपचार करण्यात आले त्यामधे औषधे ही मोफत देण्यात आली . शिबिराला श्री राजन पाटील आयुर्वेदिक […]