तळेरे आरोग्य उपकेंद्राला ग्रामपंचायतीकडून वॉटर फिल्टर भेट; रुग्णांना मिळणार थंड व स्वच्छ पाण्याचा आधार

  कणकवली (प्रतिनिधी) सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून, तीव्र उष्णतेचा त्रास सर्वसामान्यांना जाणवत आहे. या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तळेरे आरोग्य उपकेंद्रातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत एक अत्यंत कौतुकास्पद आणि लोकाभिमुख पाऊल उचलले आहे. तळेरे येथील स्थानिक आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय […]

कणकवली रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याचे भूमिपूजन

कणकवली रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याचे भूमिपूजन कणकवली (प्रतिनिधी)   कणकवली रेल्वे स्थानकातील सरकता जीनाच्या कामाचे भूमिपूजन व वातानुकुलित कक्षाचे उद्घाटन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, कोकण रेल्वेचे डीओ सुनील गुप्ता, कोकण रेल्वेचे अधिकारी शैलेंद्र बापट, शैलेश आंबोडकर, प्रशांत गाड, सुनील नारकर, आरपीएफचे […]

मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे मत्स्यव्यवसाय व बंदरे क्षेत्राला नवी गती

मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे मत्स्यव्यवसाय व बंदरे क्षेत्राला नवी गती   मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी अर्थसंकल्पात १,२४० कोटींची तरतूद ; मुंबईतील जलवाहतूक क्षेत्रासाठी ६,६०० कोटींची तरतूद   मुंबई | मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी आज आर्थिक वर्ष २०२६-२७ चा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, मजूर, मच्छीमार बांधव, महिला […]

टगबोटीचा धक्का ; ‘एम-२-एम प्रिन्सेस’ फेरीबोटीला किरकोळ हानी ; दुरुस्ती पूर्ण होताच प्रवाशांविना मुंबईकडे रवाना ; प्रवाशांना तिकीट रक्कम परत

  कणकवली (प्रतिनिधी)   विजयदुर्ग बंदरात टगबोटीचा धक्का लागल्याने ‘एम-२-एम प्रिन्सेस’ या प्रवासी फेरीबोटीला किरकोळ हानी पोहोचली. त्याची दुरुस्ती सायंकाळी उशिरा पूर्ण झाल्यानंतर ही फेरीबोट मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दुरुस्तीचा कालावधी लक्षात घेता फेरीबोट कंपनीकडून प्रवाशांनी मुंबईसाठी बुकिंग केलेल्या तिकिटाचे पैसे त्यांना परत केल्याचे व ही बोट प्रवाशांविना मुंबईला निघाल्याचे समजते.   कोकणातील जलवाहतुकीमधील मुंबई […]

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती ; जागतिक एआय रोडमॅपचा घेतला सखोल आढावा;महाराष्ट्रातील स्टार्टअप्सच्या कामगिरीचे मंत्री नितेश राणे यांच्याकडून कौतुक

नवी दिल्ली,(वृत्तसेवा)   नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या जागतिक दर्जाच्या शिखर परिषदेत राज्याचे मंत्री श्री.नितेश राणे यांनी उपस्थित राहून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील जागतिक घडामोडी, विविध देशांची धोरणे आणि भविष्यातील एआय रोडमॅप यांचा सखोल आढावा घेतला. सोमवारपासून सुरू झालेल्या या सहा दिवसीय परिषदेचे उद्घाटन माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र […]

बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य महासत्ता होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया–अडव्होकेट सुभाष आचरेकर   कणकवली (प्रतिनिधी) भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. असे हे बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य भारत देश महासत्ता होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया.भारतीय संविधानाने घालून दिलेली मुल्ये आत्मसात करुन जतन करुया असे उद्गार धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे सचिव सुभाष आचरेकर यांनी न्यू […]

रामेश्वर वाचन मंदिर आयोजित तालुकास्तरीय’कथाकथन स्पर्धेत दिव्या गावकर प्रथम

  आचरा–अर्जुन बापर्डेकर श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कै. महादेव भा. ठाकूर स्मरणार्थ श्रीम. विजयालक्ष्मी ठाकूर,आचरा पुरस्कृत मालवण तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत -कु. दिव्या नितीन गावकर -आचरा हिने प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक -कु. नंदिनी परेश बाईत -रामगड हिने पटकावला.तर तृतीय क्रमांक – कु. नुर्वी गिरीश शेटगे -आचरा उत्तेजनार्थ […]

केंद्र शाळा आचरे नं 1च्या मुलांनी घालवलानिसर्गाच्या सानिध्यात एकदिवस

  आचरा(अर्जुन बापर्डेकर)   नाही पुस्तक नाही शाळा निसर्गाच्या सानिध्यात हवे तेवढे खेळा म्हणत तोंडवळी येथील समुद्र किनारी केंद्र शाळा आचरे नं 1च्या मुलांनी एक दिवस रमत निसर्गाचा आनंद घेतला.यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, व्यावसायिक महेश राणे आदींनी भेट देत मुलांचा उत्साह वाढविला.   केंद्र शाळा आचरे नं 1विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच अवांतर ज्ञान वृद्धि साठी […]

गडकिल्ल्यांचा संवर्धनासाठी व पर्यटनवाढीसाठी मराठा समाज पुढाकार घेणार ; देवगड तालुक्यात भव्य मराठा भवन साकारण्याचा समाजाचा मानस

  विजयदूर्ग किल्ल्याचा संवर्धनासाठी केंद्र शासनाकडून ८६ लाख मंजुर मराठा समाज देवगड तालुकाध्यक्ष संदीप साटम   देवगड (प्रतिनिधी)   छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या विजयदूर्ग किल्ल्याचा संवर्धनासाठी शिवप्रेमी व मराठा समाज आग्रही होता.या किल्ल्याचा दर्या बुरूजाच्या दुरूस्तीसाठी केंद्र शासनाने ८६ लाखाचा निधी मंजुर केला याबद्दल समाधान व्यक्त होत असून अशाचप्रकारे महाराष्टड्ढातील गडकिल्ल्यांचे केंद्र […]

शिवप्रसाद पेडणेकर मित्र मंडळातर्फे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्याने प्रवीण सावंत यांचा सत्कार

वाहतूक पोलीस म्हणून प्रवीण सावंत यांची कौतुकास्पद कामगिरी ! डॉ सुनील आठवले   देवगड (हेमंत पेडणेकर)   शिवप्रसाद पेडणेकर मित्र मंडळ (SWF), देवगड तालुका गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही प्रसिद्धीचा गाजावाजा न करता विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. समाजातील तळागाळातील घटकांच्या समस्या ओळखून त्या सोडवण्यासाठी मंडळाने वेळोवेळी मोलाची भूमिका बजावली असून, सामाजिक बांधिलकी जपत अनेक […]