विजयदूर्ग किल्ल्याचा संवर्धनासाठी केंद्र शासनाकडून ८६ लाख मंजुर मराठा समाज देवगड तालुकाध्यक्ष संदीप साटम
देवगड (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या विजयदूर्ग किल्ल्याचा संवर्धनासाठी शिवप्रेमी व मराठा समाज आग्रही होता.या किल्ल्याचा दर्या बुरूजाच्या दुरूस्तीसाठी केंद्र शासनाने ८६ लाखाचा निधी मंजुर केला याबद्दल समाधान व्यक्त होत असून अशाचप्रकारे महाराष्टड्ढातील गडकिल्ल्यांचे केंद्र व राज्यशासनाने संवर्धन करावे व शिवाजी महाराज यांना मानवंदना द्यावी.देवगड तालुका मराठा समाज गडकिल्ल्यांचा संवर्धनासाठी पुढाकार घेवून पर्यटनावाढीच्या दृष्टिने पाठपुरावा करणार आहे असे देवगड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष संदीप साटम यांनी पत्रकारपरिषदेत सांगीतले.
देवगड येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.यावेळी सरचिटणीस केदार सावंत, पंकज दुखंडे, प्रकाश सावंत, दयानंद पाटील, किसन सुर्यवंशी, शंकर पाटील, बंटी कदम आदी उपस्थित होते.साटम म्हणाले, केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाने विजयदूर्ग किल्ल्याचा दर्या तटबंदीच्या दुरूस्तीसाठी ८६ लाख निधी मंजुर झाला.यासाठी खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा केला होता.त्यांचा पाठपुराव्यामुळे हा निधी मंजुर झाला असून यामुळे मराठा समाज व शिवप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे.अशाचप्रकारे पुढील काळातही केंद्र व राज्यशासनाने गडकिल्ल्याचे संवर्धन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना द्यावी अशी अपेक्षा साटम यांनी यावेळी व्यक्त केली.किल्ल्याचा संवर्धनाबरोबरच पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून देवगड तालुका मराठा समाज पुढाकार घेणार असल्याचे साटम यांनी सांगीतले.
देवगड तालुक्यातील गरजु विद्याथ्र्यांसाठी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मराठा समाज मदत करणार असल्याचेही साटम यांनी सांगीतले.देवगड तालुक्यात भव्यदिव्य स्वरूपाचे मराठा भवन उभारण्याचाही समाजाचा मानस असून जागा निश्चिती झाल्यानंतर या कामाला वेग येवून लवकरच भव्य दिव्य मराठा भवन साकारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
