वैभववाडी (प्रतिनिधी) करुळ येथे कृषी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवार दि. 1 जुलै रोजी ग्रामपंचायत करूळ, पंचायत समिती वैभववाडी व कृषी विभाग वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करुळ येथे कृषी दिन व कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी कृषी दिंडी पार पडणार आहे. […]
देवगड / प्रतिनिधी पावणाई धुरीवाडी येथील ४५ वर्षीय अपंग महिलेचा मृतदेह आढळला तिच्या घरानजीकच असलेल्या खाडीपात्रात पावणाई धुरीवाडी येथील रेश्मा चंद्रकांत सावंत (४५) या अपंग महिलेचा मृतदेह तिच्या घरानजीकच असलेल्या मोंड- वानिवडे खाडीपात्रात सोमवारी सकाळी ९ वा. च्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी […]
गोवा (प्रतिनिधी) दोडामार्गच्या देसाईचा ॲसिड हल्ल्यात हात ? म्हापसा येथून गेली पोलिसांनी अटक सुकेकुळण-धारगळ, पेडणे येथे ऋषभ शेट्ये (वय १७) या विद्यार्थ्यावर ॲसिड हल्ला केल्याप्रकरणी निलेश देसाई ( कळणे – दोडामार्ग ) याला म्हापसा येथे पोलिसांनी अटक केली आहे. संशयित म्हणून त्याला ताब्यात घेतले आहे. आज सकाळी ७.५०च्या दरम्यान अज्ञात दुचाकीस्वारांनी केलेल्या ॲसिड […]
देवगड (प्रतिनिधी) “मिठबाव पूल ते तांबळडेग गाव खारलँड बंधारा रुंदीकरणास मंजुरी ; मच्छीमार बांधवांना दिलासा, किनारपट्टी वस्त्यांचाही संरक्षण दृष्टीने महत्त्वाचा निर्णय ; अमोल लोके यांच्या पाठपुराव्याला यश मिठबाव पूल ते तांबळडेग गाव या मार्गावर अन्नपूर्णा खाडीनजीक असलेला खारलँड बंधारा हा येथील पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या समाजाचा अत्यंत आवश्यक आणि वापरात असलेला मार्ग […]
आचरा-अर्जुन बापर्डेकर वृक्षसंवर्धनाचा त्रिंबक गावचा उपक्रम कौतुकास्पद -सपोउ मिनाक्षी देसाई ग्रामपंचायत त्रिंबक आणि जागृत उन्नती मंडळ त्रिंबक यांच्या संयुक्त उपक्रमाने वृक्षारोपण संपन्न वृक्ष संवर्धन हि काळाची गरज आहे आणि त्यासाठी त्रिंबक गावातर्फे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे उद्गार आचरा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी देसाई यांनी त्रिंबक येथे काढले.ग्रामपंचायत त्रिंबक आणि जागृत उन्नती […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) जिमखाना मित्र ग्रुपचा उपक्रम कौतुकास्पद ; सर्वांनी या ग्रुपचा आदर्श घेणे गरजेचे – प्रा. रुपेश पाटील आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. या उदात्त भावनेने मागील कित्येक वर्ष जिमखाना मित्र ग्रुप सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात विधायक उपक्रम राबवित आहे. त्यांचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून इतरांनीही जिमखाना मित्र […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) महिला सुरक्षेसाठी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर ‘सेफ्टी ऑडिट’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि PRI-CBO कन्वर्जन्स प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेने सावंतवाडी रेल्वे स्थानकावर महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष ‘सेफ्टी ऑडिट’ (सुरक्षा पडताळणी) आयोजित केले. महिलांना सुरक्षित प्रवासाचे वातावरण मिळावे या उद्देशाने सकाळी आणि रात्री अशा दोन सत्रांत हे महत्त्वपूर्ण अभियान राबवण्यात आले. […]
बांदा (प्रतिनिधी) पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक बांदा दोडामार्ग राज्यमार्गावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेली अधिक माहिती अशी की, बांदा फुकेरी बस फुकेरीतुन […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा बी.फार्मसी निकाल १०० टक्के मुंबई विद्यापीठाच्या बी.फार्मसी अंतिम वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. परीक्षेला कॉलेजचे एकूण १२६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. यात भूमिका मंगेश परब हिने ९.०९ एसजीपीए […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) मळेवाड कोंडूरे अंगणवाडीची नूतन इमारतीचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या शुभहस्ते सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रातील मळेवाड कोंडूरे अंगणवाडीची नूतन इमारतीचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रातील मळेवाड कोंडूरे अंगणवाडीच्या इमारतीच्या छप्पराला गळती लागल्याने सदर […]
