मळेवाड कोंडूरे अंगणवाडीची नूतन इमारतीचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या शुभहस्ते 

0 minutes, 0 seconds Read

 

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

मळेवाड कोंडूरे अंगणवाडीची नूतन इमारतीचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या शुभहस्ते 

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रातील मळेवाड कोंडूरे अंगणवाडीची नूतन इमारतीचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

     ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रातील मळेवाड कोंडूरे अंगणवाडीच्या इमारतीच्या छप्पराला गळती लागल्याने सदर इमारत ही तातडीने बांधणे अतिशय गरजेचे होते. या इमारती करता तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. याकरिता त्या वेळचे भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली, मनीष दळवी, तत्कालीन बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी यांनी पाठपुरावा करून निधी मिळण्यासाठी मोलाचे सहकार्य केले होते. या नूतन इमारतीचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांच्या शुभहस्ते फीत कापुन व दीप प्रज्वलन करून करण्यात आला.यावेळी आपले मनोगत करत असताना दळवी यांनी गावातील जीर्ण इमारती तसेच शाळांची छप्परांच्या दुरुस्ती करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमधील लोकप्रतिनिधी तत्पर असणे गरजेचे आहे हीच तत्परता मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत सरपंच सौ मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे व सदस्यांनी दाखवून लहान मुलांसाठी असणारी अंगणवाडीची इमारत सुसज्ज उभारत मुलांची सोय केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करत असेच काम गावाच्या विकासासाठी करणे अपेक्षित असते तेच काम हे सर्व मंडळी करत आहेत असे गौरवोद्गार काढले. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी विकास निधी देण्याचे आश्वासन दिले.

या शुभारंभ प्रसंगी सरपंच सौ मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव,कविता शेगडे, सानिका शेवडे, महेश शिरसाट,अर्जुन मुळीक, अमोल नाईक, पोलीस पाटील राजाराम मुळीक,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,रोजगार सेवक अमित नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष सौ.दर्शना शिरसाठ अंगणवाडी सेविका,आशा,सीआरपी व ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपसरपंच हेमंत मराठे यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *