कणकवली नगरपंचायत दोन जिल्हाध्यक्षांची प्रतिष्ठापणाला ! 

‘प्रभाग क्र. १७’ मध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक विरुद्ध युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आमने सामने कणकवली (तुळशीदास कुडतरकर) कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना कणकवलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कणकवली नगरपंचायतीतील प्रभाग क्र. १७ हा संपूर्ण निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी प्रभाग ठरत आहे. दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची राजकीय कसोटी या प्रभागातून […]

ठेकेदाराचा ‘मनमानी’ कारभार; निरवडे-तळवडे रस्त्याच्या दुर्दशेमुळे दुचाकीस्वार त्रस्त

रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा, अन्यथा आंदोलन; चेतन गावडेंचा इशारा… सावंतवाडी (प्रतिनिधी) निरवडे देऊळवाडी ते तळवडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट सोडणाऱ्या बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी, आणि रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा युवासेना विभाग प्रमुख चेतन गावडे यांनी ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रशासनाला दिला आहे. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे दुचाकीस्वार घसरून […]

कणकवली बाजारपेठेत भाजपाची भव्य प्रचार रॅली, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली  कणकवली (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कणकवली बाजारपेठेत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री पटकी देवी ते पटवर्धन चौक अशी […]

नगरपंचायतची ही माझी शेवटची निवडणूक  ; कणकवलीकरांनी विकास करण्यासाठी मला एक संधी द्यावी संदेश पारकर 

९०० कोटींच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काय झाले ? भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली साठी माझी लढाई कणकवली (प्रतिनिधी ) कणकवली शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ९०० कोटींचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प सत्ताधारी आणणार होते. या प्रकल्पासाठी ३ एकर जमिनी कराराने एजी डॉटर्स या कंपनीला दिली होती. या प्रकल्पाचे काय झाले? भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली साठी माझा […]

दोन भाईत सरशी कोणाची ! कणकवली नगरपंचायतीच्या राजकीय आराखडा रंगतोय

‘शहर विकास आघाडी विरुद्ध भाजप’ : पारकर–नलावडे यांच्यातील प्रतिष्ठेची लढत निर्णायक टप्प्यात   कणकवली (तुळशीदास कुडतरकर) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कणकवली हे नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारे हे शहर राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे राज्यात सतत चर्चेत राहते. राज्यातील राजकीय समीकरणे काहीही असली तरी कणकवलीचा राजकीय पॅटर्न वेगळाच आणि अनेकदा ‘निर्णायक’ ठरलेला आहे. याच पार्श्वभूमीवर […]

आम.निलेश राणेंनी प्रभाग 11 मध्ये मतदारांच्या घेतल्या भेटी संदेश पारकरांना विजयी करा ; मतदारांना केले आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) कणकवली नगरपंचायत रणधुमाळी सुरु असुन प्रचार शिगेला पोहोचला आहे.कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारासाठी कुडाळ मालवण चे आमदार डॉ.निलेश राणे यांनी आज कणकवलीत 11 नंबर प्रभागात भेट दिली. यावेळी महाडीक परीवारातर्फे आम.निलेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी आमदार निलेश राणे यांनी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे […]

१० हजार रूपये घेऊन दिवसाला ५ रुपयांना विकले जाऊ नका, आपली किंमत ओळखा. ५ वर्षांचा विचार करुन मतदान करा – अन्नपूर्णा कोरगावकर

१० हजार रूपये घेऊन दिवसाला ५ रुपयांना विकले जाऊ नका, आपली किंमत ओळखा. ५ वर्षांचा विचार करुन मतदान करा – अन्नपूर्णा कोरगावकर   सावंतवाडी : १० हजार रूपये घेऊन दिवसाला ५ रुपयांना विकले जाऊ नका, आपली किंमत ओळखा. ५ वर्षांचा विचार करुन मतदान करा, नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक रिंगणात उतरले आहे. मला मेणबत्ती […]

कणकवली शहर स्वच्छ , सुंदर बनवण्याची जबाबदारी माझी – मंत्री नितेश राणे

कणकवलीच्या विकासात दुसरा टप्पा महत्वाचा ; समीर नलावडे व सहकारी जनमाणसांत 24 तास काम करणारे सहकारी कणकवली : कणकवली शहरात सर्वांगिण विकास करण्यासाठी भाजपाचा सक्षम पर्याय आहे. शहरातील अद्ययावत भाजीमार्केट, चांगली ड्रेनेज व्यवस्था , पार्किंगसाठी चांगली व्यवस्था , अद्यावत गार्डन ही दुस-या टप्प्यातील कामे मार्गी लावली जातील. देशात मी जेव्हा आमदार होतो.तेव्हा चांगला निधी दिला […]

होय…मी नगराध्यक्ष होणार ही काळया दगडावरची पांढरी रेष – समीर नलावडे

राणेंचा शिलेदार म्हणून कणकवलीतील जनता माझ्या पाठीशी    कणकवली (तुळशीदास कुडतरकर) कणकवली नगरपंचायतीचा मी नगराध्यक्ष होणार ही काळया दगडावरची पांढरी रेष आहे कारण दस्तूर खुद्द आमचे नेते खासदार नारायण राणे हे आमच्या पाठीशी आहेत.राणेंचा शिलेदार म्हणून कणकवलीतील जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना महत्व देण्याची मला गरज नाही. ही जनताच मला नगराध्यक्षपदी विराजमान करणार […]

पत्रकार विष्णू धावडे यांना “कोकण रत्न पदवी पुरस्कार जाहीर

स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली अधिकृत घोषणा १३ डिसेंबर रोजी मुंबई येथे कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा देवगड | देवगड तालुक्यातील तांबळडेग गावचे सुपुत्र पत्रकार विष्णू धावडे यांना पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच “कोकण रत्न पदवी पुरस्कार साठी अधिकृत घोषणा केली आहे.विष्णू […]