सावंतवाडी (प्रतिनिधी) मळेवाड कोंडुरे येथे जांभळीचे भरड येथील शेणमळी येथे जागा अकृषिक न करता विना परवाना खनिज साठा करून ठेवलेला असून आज मळेवाड तलाठी अनुजा भास्कर यांनी कोंडुरे पोलिस पाटील बाबुराव मुळीक, व जमीन मालक सदाशिव परब यांच्या समवेत घटनास्थळी जात पंचनामा केला.यावेळी 500 ब्रास खनिज साठा अकृषिक परवाना नसलेल्या जमिनीत साठवून ठेवला असल्याचे […]
वैभववाडी (प्रतिनिधी) आचिर्णे गावच्या श्री रासाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार (ता.३) जानेवारी होत आहे. यानिमित्ताने मंदीरात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात तयारीला वेग आला असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरवर्षी पौष पौर्णिमेला आचिर्णे गावच्या श्री रासाई देवीचा जत्रोत्सव संपन्न होतो. यावर्षीचा हा जत्रोत्सवाचा सोहळा शनिवारी (३ […]
आचरा (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील वायंगणी गावातील मराठी माध्यमांच्या शाळांतील शिक्षक कपात धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गंभीर आघात होत असल्याने वायंगणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत निषेध नोंदविला असून ग्रामसभेत या धोरणाविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. शासनाने तात्काळ दखल न घेतल्यास वायंगणी ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन व लाक्षणिक साखळी उपोषण करण्याच्या तयारीत […]
वैभववाडी (प्रतिनीधी ) वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे गावातील आचिर्णे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्वेहसंमेलन व पारितोषिक सोहळा २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित केला आहे . स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुनांना वाव मिळावा या दृष्टीकोणातून दरवर्षी हा सोहळा ठेवण्यात येतो . तसेच संस्थेचे अध्यक्ष मा . श्री . विजय रावराणे प्रमुख पाहुणे […]
वैभववाडी (प्रतिनिधी) श्री रासाई देवी यात्रेनिमित्त श्री रासाई स्पोर्ट क्रिडामंडळ आचिर्णे यांच्या मार्फत आचिर्णे मोईनवाडी येथे ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . या स्पर्धेत तालुक्यातील नामवंत संघ सहभाग घेणार आहेत असे आव्हान श्री रासाई स्पोर्ट क्रिडा मंडळ यांनी दिले आहे तसेच आचिर्णे गावातील कबड्डी प्रेमिंनी कबड्डी सामने […]
रणजीत तावडे, सुभाष रावराणे, सानिका रावराणे व सुंदराबाई निकम यांना संधी वैभववाडी (प्रतिनिधी) वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडी बिनविरोध पार पाडल्या आहेत. नगरपंचायतीच्या तीन सभापती व एक उपसभापती पदाची निवडणूक जाहीर झाली होती. सर्व पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणुक बिनविरोध पार पाडली. यामध्ये बांधकाम सभापती पदी रणजीत तावडे यांची […]
देवगड व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने आयोजित ‘जल्लोष २०२६’चे जल्लोषात उद्घाटन देवगड (प्रतिनिधी) देवगड म्हणजे केवळ एक तालुका नसून निसर्गाची देणगी, हापूस आंब्याचा सुवास, समुद्रकिनारे आणि कष्टाळू माणसांची ओळख असल्याचे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले. देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने आयोजित “जल्लोष २०२६” या भव्य पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत […]
वैभववाडी (तुषार शिंगाडे) आज जगभरात ३१ डिसेंबरचा उत्साह असून नागरिक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे आणि शहरांमध्ये गर्दी करत आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील शिराळा या गावात चित्र काही वेगळेच आहे. जिथे जग ‘पार्टी’च्या मूडमध्ये आहे, तिथे शिराळा गावचे ग्रामस्थ आपल्या परंपरा जपत आजपासून ‘गावपळण’ करण्यासाठी सज्ज झाले आहेत. देवस्थानचा कौल आणि परंपरेची सुरुवात […]
कणकवली (प्रतिनिधी) गोपुरी आश्रमाच्या जीवन शिक्षण उपक्रमांतर्गत बब्बल प्रिंट आर्ट कार्यशाळा आयोजित केली होती. यात विद्यार्थ्यांनी रंगांच्या बुडबुड्यांपासून क्रिएटीव्ही चित्रे रेखाटून आपल्यातील कल्पकता अन् सृजनशीलता दाखवून दिली.गोपुरी आश्रमाच्या जीवन शिक्षण उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या दुसºया व चौथ्या रविवारी जीवन विविध विषयावर पहिली ते नववीपर्यंत मुलांसाठी कार्यशाळा घेतल्या जातात. याच उपक्रमांतर्गत रविवार २८ रोजी गोपुरी […]
वैभववाडी ( प्रतिनिधी) वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित यांच्या वतीने सन 2025-26 या वर्षासाठी शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत भात खरेदीचा शुभारंभ सोमवार, 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम वैभववाडी येथील तालुका खरेदी विक्री संघ कार्यालयात पार पडणार आहे. शासकीय आधारभूत किंमत योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या […]
