रणजीत तावडे, सुभाष रावराणे, सानिका रावराणे व सुंदराबाई निकम यांना संधी
वैभववाडी (प्रतिनिधी)
वाभवे वैभववाडी
नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडी बिनविरोध पार पाडल्या आहेत.
नगरपंचायतीच्या तीन सभापती व एक उपसभापती पदाची निवडणूक जाहीर झाली होती. सर्व पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणुक बिनविरोध पार पाडली. यामध्ये बांधकाम सभापती पदी रणजीत तावडे यांची फेरनिवड झाली आहे. शिक्षण व आरोग्य सभापतीपदी सुभाष रावराणे, महिला व बालकल्याण सभापती पदी सानिका रावराणे तसेच महिला व बालकल्याण उपसभापती पदी सुंदराबाई निकम यांची निवड जाहीर झाली आहे.
दुपारी दोन नंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी अधिकृतरित्या निवडीची घोषणा केली. निवडीनंतर अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी नूतन सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, संजय सावंत, डॉ. राजेंद्र पाताडे, नेहा माईणकर, रोहन रावराणे, राजन तांबे व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
