वैभववाडी (प्रतिनिधी)
श्री रासाई देवी यात्रेनिमित्त श्री रासाई स्पोर्ट क्रिडामंडळ आचिर्णे यांच्या मार्फत आचिर्णे मोईनवाडी येथे ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . या स्पर्धेत तालुक्यातील नामवंत संघ सहभाग घेणार आहेत असे आव्हान श्री रासाई स्पोर्ट क्रिडा मंडळ यांनी दिले आहे तसेच आचिर्णे गावातील कबड्डी प्रेमिंनी कबड्डी सामने पाहण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती श्री रासाई स्पोर्ट आचिर्णे मोईनवाडी वासियांनी केली आहे .
