आचरा – अर्जुन बापर्डेकर
चिंदर गावचे आराध्य दैवत श्री देवी भगवती माऊलीचा पाषाण पुनः प्रतिष्ठापना ११ वर्धापन दिन सोहळा मंगळवार २१ एप्रिल ते बुधवार २२ एप्रिल रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार असून मंगळवार २१ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य परण, सकाळी ९ वा. मुख्य देवता स्थापन, सकाळी १० वा. सप्तशती पाठजप, दुपारी १२.३० वा. आरती, मंत्रपुष्प, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, संध्याकाळी ४ ते ८ स्थानिक भजने, रात्रौ १० वा. कलादर्पण व मनातली जाणीव पुरस्कार विजेता सहकुटुंब पहावा असा घरंदाज लावण्याचा नृत्याविष्कार गणकम स्मित हरी प्रॉडक्शन ! सौ. स्मिता हरी पाटणकर प्रस्तुत “लावण्य दरबार” सादर होणार आहे
बुधवार २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. स्थानिक देवता पूजन, सकाळी ९ वा. अग्नी स्थापन, ग्रह स्थापन, सकाळी १० वा. ग्रहयजन, सप्तशती हवन, दुपारी १२ वा. कुमारीका पूजन, सुहासिनी पूजन, दुपारी १२.३० वा. कृषमांडबली, बलीदान, पुर्णाहुती, दुपारी १ वा. – अभिषेक, आरती, मंत्रपुष्प, सांगता, महाप्रसाद, संध्याकाळी ४ ते ६ हळदीकुंकू समारंभ, संध्याकाळी ४ ते ८ स्थानिक भजने, रात्री ८ वा. आजी माजी बारा पाच मानकरी, हितचिंतक, देणगीदार, मान्यवर यांचा सत्कार सोहळा, रात्रौ १० वा. कलेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग “राखणदार देव राठीचा भूतनाथ देव सकलांचा” सादर होणार असून भाविक, भक्त, हितचिंतक, देणगीदार यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंदर गावचे बारा पाच मानकरी, श्री भगवती सेवा समिती, श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी, चिंदर भटवाडी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई व मुंबई व स्थानिक ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
