वैभववाडी तालुक्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात धनगर समाज असून या जि प व पं स निवडणुकीत एकही धनगर समाजाचा उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाकडून दिलेला नाही – धनगर समाज युवा कार्यकर्ते विकास अडुळकर यांचा घणाघात

विशेष करून सत्ताधारी पक्षाला धनगर समाजाची मते पाहिजेत पण धनगर समाजाचा नेतृत्व मान्य नाही ही शोकांतिका   वैभववाडी( प्रतिनीधी)   वैभववाडी तालुक्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने एक धनगर समाज युवा कार्यकर्ते विकास अडुळकर यांचा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक पार्श्वभूमीवर सत्ताधारी व इतर राजकीय पक्षाला सवाल केला आहे. अडुळकर यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकात असे […]

कणकवली उपनगराध्यक्षपदी विजयी झाल्याबद्दल सुशांत नाईक यांचे मा.आम. वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, सतीश सावंत यांनी केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव करत १० मते घेऊन सुशांत श्रीधर नाईक हे विजयी झाले.त्याबद्दल माजी आमदार वैभव नाईक,कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, यांनी सुशांत नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.   यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक,जयेश धुमाळे,सुमेधा […]

गीतेश राऊत याला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण -वैभव नाईक

गीतेश राऊत यांच्या प्रचारार्थ मा.खा.विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सांताक्रूझ येथे कॉर्नर सभा संपन्न   मुंबई (तुळशीदास कुडतरकर) शिवसेनेने कधीही जाती धर्माचे राजकारण केले नाही. मुंबईतील मराठी माणसाचा आवाज बनण्याचे काम शिवसेनेने केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून मुंबईवर होणाऱ्या अन्याविरोधात संघर्ष केला आहे. शिवसैनिक आणि मनसैनिक अन्यायग्रस्त नागरिकांची ढाल बनून नेहमी कार्यरत असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेना, […]

सिंधुदुर्गात जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढविणार

मागील साडेतीन वर्षातील सत्ताधाऱ्यांचे अपयश जनतेसमोर मांडणार ; कणकवली विजय भवन येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न कणकवली (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज कणकवली विजय भवन येथे माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. होऊ घातलेल्या जिल्हापरिषद आणि […]

वैभव नाईक यांच्यासोबत झालेली भेट वैयक्तिक – राजन तेली

आ. निलेश राणे यांच्या ट्विट संदर्भात चर्चा करणार ; महायुतीचे नेते म्हणून मांडलेली भूमिका योग्यच कणकवली : कणकवली येथील माझ्या निवासस्थानी ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक हे वैयक्तिक भेटीसाठी आले होते. कोकणात आलेल्या माणसाचे आदरातिथ्य करणे ही आपली संस्कृती आहे. त्या भेटीत राजकीय चर्चा कुठलीही झालेली नाही .   केवळ माध्यमांमध्ये चर्चा माझ्या भेटीची […]

होय…मी नगराध्यक्ष होणार ही काळया दगडावरची पांढरी रेष – समीर नलावडे

राणेंचा शिलेदार म्हणून कणकवलीतील जनता माझ्या पाठीशी    कणकवली (तुळशीदास कुडतरकर) कणकवली नगरपंचायतीचा मी नगराध्यक्ष होणार ही काळया दगडावरची पांढरी रेष आहे कारण दस्तूर खुद्द आमचे नेते खासदार नारायण राणे हे आमच्या पाठीशी आहेत.राणेंचा शिलेदार म्हणून कणकवलीतील जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना महत्व देण्याची मला गरज नाही. ही जनताच मला नगराध्यक्षपदी विराजमान करणार […]

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी मंत्री नितेश राणे घेतले दर्शन 

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त घेतले दर्शन भक्तांशी , विक्रेत्यांशी साधला संवाद ; संस्थानच्या पदाधिका-यांची घेतली भेट  कणकवली (प्रतिनिधी) कणकवली येथील योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त प.पु.भालचंद्र महाराज समाधी स्थळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतले.यावेळी आपल्या कणकवली मतदारसंघातील सर्वसामान्य जनता सुखी ‘समृध्द राहो असे गाऱ्हाणे घातले. भक्तांशी […]

कणकवलीचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता भाजपमध्ये – मंत्री नितेश राणे 

पालकमंत्री नितेश राणेंकडून खळा बैठकांचा सपाटा :- विविध प्रभागातील नागरिकांशी संवाद  कणकवली (प्रतिनिधी) कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवकपदाच्या भाजप उमेदवारांना निवडून द्या. भाजपकडे विकासाचे व्हिजन आहे. कणकवली न. पं. क्षेत्राच्या विकासासाठी मीच निधी देणार आहे. विरोधक सुद्धा तेच म्हणताहेत सत्तेवर आल्यावर निधीसाठी पालकमंत्र्याकडे जावु. त्यामुळे त्यांचे काम करण्याअगोदर पहिल्यांदा भाजपच्या नगरसेवकांचे होईल. म्हणून इकडे-तिकडे विचार करण्यापेक्षा […]

भालचंद्रबाबांच्या भूमीत रहात असलेली जनता सुज्ञ विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही – सुशांत नाईक

  कणकवली |माझ्या विरोधातील उमेदवाराकडून सुरु असलेल्या आमिषाबाबत आम्ही तक्रार केलेली आहे. हे लोक जनतेला फसवत आहेत. आता काही आश्वासने देतील, मात्र पुढील ५ वर्षात मतदारसंघात फिरणार नाहीत, असा टोला कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १७ मधील शहर विकास आधाहोचे उमेदवार तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला आहे. दरम्यान भालचंद्रबाबांच्या भूमीतील जनता विरोधकांच्या भूलथापाना […]

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ ही नगरसेवकांनी घेतले खासदार नारायण राणेंचे शुभाशीर्वाद

  ओम गणेश निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतली खासदार राणेंची भेट माझा भाजपच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा, इतर कोणालाही पाठिंबा नाही   कणकवली (हेमंत मराठे)कणकवली नगरपंचायत चे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ ही प्रभागातील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट […]