भालचंद्रबाबांच्या भूमीत रहात असलेली जनता सुज्ञ विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही – सुशांत नाईक

 

कणकवली |माझ्या विरोधातील उमेदवाराकडून सुरु असलेल्या आमिषाबाबत आम्ही तक्रार केलेली आहे. हे लोक जनतेला फसवत आहेत. आता काही आश्वासने देतील, मात्र पुढील ५ वर्षात मतदारसंघात फिरणार नाहीत, असा टोला कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १७ मधील शहर विकास आधाहोचे उमेदवार तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला आहे.

दरम्यान भालचंद्रबाबांच्या भूमीतील जनता विरोधकांच्या भूलथापाना बळी पडणार नाही, जनता सुज्ञ आहे, त्यामुळे योग्य त्याच उमेदवाराची निवड करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कणकवली येथे निशाणी वाटपानंतर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी राष्ट्रबादी शरद पवार पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, नगरसेवक पदाचे उमेदवार संकेत नाईक, जयेश धुमाळे आदी उपस्थित होते

सुशांत नाईक म्हणाले, माझ्या विरोधातील उमेदवारांनी, प्रभाग ४ मध्ये गेल्यावेळीच्या निवडणूकीत टीव्ही, फ्रिज वाटून मतदान मिळवले होते. तशाच पध्दतीने प्रभाग १७ मध्ये काही वाटप केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे अशा पध्दतीच्या भुलथापांना मतदार पडणार आहेत का? असा सवाल करताना या आमिषांबाबत निवडणूक विभागाकडे तोंडी तक्रार केल्याची माहिती सुशांत नाईक यांनी दिली आहे.

कणकवली शहरात स्वयंभू रवळनाथ, भालचंद्र बाबांच्या भूमीत राहत असलेले कणकवलीकर अशा भुलथापांना बळी पडणार नाहीत. काहीतरी वाटल्यानंतर पुन्हा माझ्या विरोधातील उमेदवार त्या प्रभागात फिरले नाहीत, प्रभाग १७ मध्ये माझ्या विरोधात राहुन विरोधी उमेदवार पैशाचा बाजार करीत आहेत.

विरोधकांकडून कणकवली शहरात सध्या पैशाचा बाजार सुरु झालेला आहे. खुप आमिषे येतील परंतु जनतेने ठरवायचे आहे. चांगले उमेदवार सामाजिक बांधिलकी जोपासून काम करणाऱ्या लोकांना संधी दिली पाहिजे. आमची नारळ ही निशाणी असल्याने जनता भरभरुन मतदान करेल. आणि विरोधकांचा बाजार जनताच उठवेल, असे सुशांत नाईक म्हणाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *