पतंजली योग समिती-सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी (जिल्हाध्यक्ष) पदी विद्याधर पाटणकर यांची नियुक्ती

  सावंतवाडी : परमपूजनीय स्वामी रामदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने पतंजली भारत स्वाभिमान न्यास महाराष्ट्र पश्चिमचे राज्य प्रभारी बापूजी पाडळकर व पतंजली योग समिती महाराष्ट्र पश्चिम राज्य प्रभारी श्री चंद्रशेखर खापणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती केली आहे.   पतंजली योग समिती, सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारीपदी (अध्यक्षपदी) श्री.विद्याधर पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान इतरही पदाधिकाऱ्यांची […]

मळेवाड सातार्डा मार्गावरील रस्त्यालगत टाकले अज्ञात व्यक्तीने सहा डुक्कर,सर्वत्र पसरली दुर्गंधी

सावंतवाडी – मळेवाड सातार्डा मार्गावरील कोंडुरे जांभळीचे भरड येथे एका अज्ञात व्यक्तीने मृतावस्थेतील तीन मोठे डुक्कर व तीन डुकरांची पिल्ले रस्त्यालगत टाकल्याने या परिसरात एकच दुर्गंधी पसरली.ग्रामपंचायत सदस्य अमोल या घटनेची माहिती मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांना दिल्यानंतर मराठे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी व पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती […]

देवगड तालुक्यात निवडणुकीची धामधूम : शिरगाव जिल्हा परिषदेसाठी अजित कांबळेंचा दावा बुलंद

  देवगड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तालुक्यात धामधूम सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांच्या युतीमुळे कोकणात मैत्रीपूर्ण लढती दिसतील, अशी परिस्थिती आहे. दरम्यान, आरक्षण सोडती नंतर अनेक इच्छुकांची समीकरणे बदलली असून, काही मतदारसंघांत उमेदवारांच्या ‘आयात-निर्यात’ चे राजकारणही पाहायला मिळत आहे.   देवगड तालुक्यातील ७ जिल्हा […]

चिंदर अपराजवाडी येथे 2 नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह

आचरा–अर्जुन बापर्डेकर चिंदर अपराजवाडी येथील ब्राह्मण देव मंदिर येथे रविवार २ नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहा दिवशी सकाळी ९ वाजता घट स्थापना करुन सप्ताहाला सुरूवात होणार आहे. दुसऱ्या दिवशी ३ नोव्हेंबर सकाळी १० वाजेपर्यंत सप्ताह सुरु राहणार आहे. यानंतर मंगळवारी ४ नोव्हेंबर ला सकाळी ब्राह्मण देव […]

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण ; मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, : – राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि तोडणी विषयी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी यामुळे राज्यात पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. इंडिया मेरीटाईम वीक २०२५ अंतर्गत आज नेस्को गोरेगाव येथे महाराष्ट्राचे जहाज बांधणी धोरण या विषयी नेदरलँड, सिंगापूर यासह देशातील सागरी क्षेत्रातील उद्योजकांसोबत […]

वैभववाडी येथे शिवसेना (उबाठा) पक्षाची तालुका आढावा बैठक

  वैभववाडी (प्रतिनिधी) पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची वैभववाडी तालुका आढावा बैठक शिवसेना कार्यालय, वैभववाडी येथे पार पडली. या बैठकीत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांचा सखोल आढावा घेण्यात आला व सर्व जागा पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला वैभववाडी तालुका सचिव गुलजार […]

मडुरा परिसरात भात पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे ;तहसीलदार सावंतवाडी यानी संबंधीतांना दिले आदेश

  बांदा (मंगल कामत) मडूरा पंचक्रोशीतील गावांमध्ये गेले पंधरा दिवस मुसळधार पाऊस होत असल्याने कापणी योग्य झालेले परिपक्व भातपीक कुजून गेले आहे. शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानुसार आज कृषी विभागाने व महसूल […]

अबू धाबी पोर्ट्ससोबत ऐतिहासिक करार; समुद्री विकासासाठी तब्बल ₹16,500 कोटींची गुंतवणूक

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी चालना मुंबई : महाराष्ट्राने समुद्री क्षेत्रात मोठी झेप घेत ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्ट्स ग्रुप सोबत महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) झाला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा करार एखाद्या राज्यासोबत.आणि तेही मत्स्य व बंदरे […]

दिवाळीचा आनंद ! पहिल्याच देवगड हापूसला मिळाला २५ हजाराचा सुगंध

दिवाळीचा आनंद ! पहिल्याच देवगड हापूसला मिळाला २५ हजाराचा सुगंध   नवी मुंबई : देवगड पडवणे येथील प्रकाश शिर्सेकर यांच्या आंबा बागेतील सहा डझन हापूस आंब्याची पहिली पेटी प्रथमच ऑक्टोंबर महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई वाशी येथील एपीएमसी फ्रुटमार्केट मे.नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी गाळा नंबर J-४३४/ ४५५ यांच्याकडे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर विक्रीसाठी आली होती.   या पहिल्याच […]

रॉकगार्डन पुन्हा उजळले ! 

रॉकगार्डन पुन्हा उजळले !   मालवण : शहरातील रॉकगार्डनचा वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रशासनाने काही दिवसांपूर्वी ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत होते. पायी फिरायला येणारे पर्यटक, छोटे व्यावसायिक आणि पालिकेचेही उत्पन्न घटले होते.     या समस्येबाबत स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी […]