रॉकगार्डन पुन्हा उजळले ! 

रॉकगार्डन पुन्हा उजळले !

 

मालवण : शहरातील रॉकगार्डनचा वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रशासनाने काही दिवसांपूर्वी ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत होते. पायी फिरायला येणारे पर्यटक, छोटे व्यावसायिक आणि पालिकेचेही उत्पन्न घटले होते.

 

 

या समस्येबाबत स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी पालिका प्रशासनाशी चर्चा करून वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. व्यावसायिकांचा ठाम आवाज आणि शिल्पा खोत यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर पालिकेकडून रॉकगार्डनचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

 

रॉकगार्डन पुन्हा प्रकाशमान झाल्याने पर्यटन व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली असून व्यावसायिकांनी शिल्पा खोत यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *