मुंबईतील शेतकरी मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात  ; माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली मुंबईत दिग्गज नेते राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदेची भेट

      देवगड ( प्रतिनिधी)            कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून वा-यावर सोडल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महिनाअखेरीस कोकणातील आंबा व काजू बागायतदार धडक देणार आहे. या मोर्चास सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा देवून सहभागी व्हावे याकरिता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज […]

मळई येथे १ ते ३ एप्रिल कालावधीत हनुमान जन्मोत्सव सोहळा

  देवगड : प्रतिनिधी   जामसंडे मळई येथिल हनुमान मंदीरामध्ये दि. १ ते ३ एप्रिल या कालावधीत हनुमान मंदीर वर्धापन दिन व हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   जामसंडे मळई येथील बाल मंडळ संगीत मेळा मळई या मंडळाच्यावतीने दि. १ ते ३ एप्रिल या कालावधीत हनुमान मंदीरामध्ये […]

नळधारकांना पाणी न मिळाल्यास कारवाई; हायवे कामात पाइपलाईनचे नुकसान टाळा ; देवगड पंचायत समितीच्या बैठकीत सभापती गणेश राणे यांचे ठेकेदार व अधिकाऱ्यांना सक्त आदेश

    देवगड (प्रतिनिधी)   देवगड व विजयदुर्ग प्रादेशिक नळ योजनांमधून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास संबंधित विभाग व ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी दिला. नळधारकांना पाणी मिळाले नाही म्हणून तक्रारी घेऊन पंचायत समिती कार्यालयात यावे लागणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या. […]

श्री देव रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा ; चैत्र नवरात्र उत्सवाची दिमाखात सांगता

  देवगड (प्रतिनिधी)   मिठबाव, कातवण आणि तांबळडेग गावांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिरात यंदाचा चैत्र नवरात्र उत्सव भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहात पार पडला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या उत्सवात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी पुराण वाचन, गायन ,कीर्तन आणि रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढण्यात येत होती. या कार्यक्रमांमुळे मंदिर […]

तळेबाजार येथे सार्वजनिक विहिरीचे भूमिपूजन; पाण्याच्या प्रश्नावर दिलासा

देवगड (प्रतिनिधी) तळेबाजार येथे सार्वजनिक विहिरीच्या कामाचे भूमिपूजन तळवडेचे सरपंच तथा प्रशासक गोपाळ रुमडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या विहिरीच्या उभारणीमुळे तळेबाजार बाजारपेठ तसेच साईनगर परिसरातील पाण्याच्या गंभीर प्रश्नाला मोठा दिलासा मिळणार आहे.   भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष रोहित म्हापसेकर आणि सामाजिक कार्यकर्ते बापु जोईल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला अखेर मंजुरी मिळाली असून […]

गॅसटंचाईचा धास्तीने लोकांचा गॅस एजन्सीसमारे रांगा ; घरगुतीसाठी दोन तीन दिवस पुरवठा होईल असा साठा सध्या उपलब्ध ; पुरवठा विभागाची माहिती

  वैभववाडी : प्रतिनिधी   आखाती देशातील युध्दाचा पाश्र्वभुमीवर राज्यात गॅसटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून टंचाईचा भीतीने लोकांनी गॅस सिलेंडरसाठी गॅस एजन्सीसमोर रांगा लावल्या असे चित्र सध्या देवगड मध्ये दिसत आहे.कमर्शियल गॅस पुरवठा होत नसल्याने त्याचा थेट परिणाम हॉटेल व्यावसायिक व संबंधित घटकांवर होत आहे.   तालुक्यात हॉटेल व्यावसायिक अडचणीत असून व्यवसाय बंद करण्याची स्थिती […]

कृषी दर्जा मिळाल्याने मच्छिमारांनाही कर्जमाफी द्यावी ; देवगड फिशरमेन्स सोसायटीच्या बर्फ कारखान्याच्या व्याजात सवलतीची मागणी

देवगड (प्रतिनिधी) मच्छिमारी व्यवसायाला राज्य शासनाने कृषी दर्जा दिल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजना, सवलती व कर्जमाफीचा लाभ मच्छिमारांनाही देण्यात यावा, तसेच देवगड फिशरमेन्स को-ऑप. सोसायटीच्या बर्फ कारखान्यावरील कर्जाच्या व्याजात भरीव सवलत देण्यात यावी, या मागणीसाठी देवगड येथील मच्छिमारांनी पालकमंत्री मा. नितेश राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.   देवगड फिशरमेन्स को-ऑप. सोसायटी लिमिटेड, देवगड […]

गिर्ये पवन ऊर्जा प्रकल्पाला मिळणार नवसंजीवनी ; अपारंपरिक ऊर्जा मंत्री सावे यांनी माजी आमदार भाई गिरकर यांची माहिती

  देवगड (प्रतिनिधी) तालुक्यातील गिर्ये गावातील जुन्या पवनऊर्जा प्रकल्पच्या ठिकाणी नव्याने पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे व याच प्रकल्पच्या उर्वरित जागेत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. हे दोन्ही संयुक्त प्रकल्प उभारण्याबाबतचा निर्णय झाला असून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती राज्याचे अपारंपारिक मंत्री अतुल सावे यांनी माजी समाजकल्याण मंत्री, माजी […]

महागड्या मोबाईलच्या खरेदीसाठी आईने पैसे न दिल्याने युवकाची वाढदिवसादिवशीच आत्महत्या

  देवगड / प्रतिनिधी   महागड्या नवीन मोबाईल खरेदीसाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून जामसंडे सहकारनगर येथील आर्यन सुभाष रवंदे (२२) याने आपल्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास लावून घेतला. त्याला तात्काळ जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तो मयत झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११.२० वा. च्या सुमारास घडली. […]

आंबा कलम बागेत घुसून कामगारावर कोयत्याने प्राणघातक हल्ला ; पोयरे येथे मध्यरात्रीचा थरार ; चार अनोळखी संशयितांविरुद्ध देवगड पोलिसांत गुन्हा

  देवगड (प्रतिनिधी)   देवगड तालुक्यातील पोयरे येथील एका आंबा कलम बागेमध्ये अनधिकृत प्रवेश करून बागेत आंबा राखणीच्या कामास असलेल्या कमल साधू नाथ (१९, सध्या रा. पोयरे, मूळ रा. निगासन लखिमपूर खिरी, रा. उत्तरप्रदेश) याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यावर कोयत्याने प्रहार केल्याप्रकरणी चार अनोळखी संशयितांवर देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   […]