देवगड (प्रतिनिधी)
तळेबाजार येथे सार्वजनिक विहिरीच्या कामाचे भूमिपूजन तळवडेचे सरपंच तथा प्रशासक गोपाळ रुमडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या विहिरीच्या उभारणीमुळे तळेबाजार बाजारपेठ तसेच साईनगर परिसरातील पाण्याच्या गंभीर प्रश्नाला मोठा दिलासा मिळणार आहे.
भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष रोहित म्हापसेकर आणि सामाजिक कार्यकर्ते बापु जोईल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला अखेर मंजुरी मिळाली असून आज प्रत्यक्ष भूमिपूजन करण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या शुभारंभ प्रसंगी माजी सरपंच पंकज दुखंडे, ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते दत्तप्रसाद (बापु) जोईल तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
