मळई येथे १ ते ३ एप्रिल कालावधीत हनुमान जन्मोत्सव सोहळा

0 minutes, 1 second Read

 

देवगड : प्रतिनिधी

 

जामसंडे मळई येथिल हनुमान मंदीरामध्ये दि. १ ते ३ एप्रिल या कालावधीत हनुमान मंदीर वर्धापन दिन व हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

जामसंडे मळई येथील बाल मंडळ संगीत मेळा मळई या मंडळाच्यावतीने दि. १ ते ३ एप्रिल या कालावधीत हनुमान मंदीरामध्ये श्री हनुमान मंदीर वर्धापन दिन, श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा व श्री सत्यनारायण महापुजा आयोजित करण्यात आली असून यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.बुधवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वा.पासून पुजा आरती, लघुरूद्र, सायंकाळी महाआरती, स्थानिक भजने व रात्री ९ वाजता स्थानिक महिलांचा कलाविष्कार फुगडी हे कार्यक्रम होणार आहेत.

 

गुरूवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी ६.३३ वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा, आरती, दर्शन व तीर्थप्रसाद, पालखीप्रदक्षिणा, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी होममिनिस्टर स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने, रात्री १०.३० वाजता धमाल विनोदी मालवणी दोन अंकी नाटक बायको शिवाय काय खरा नाय हे कार्यक्रम होणार आहेत.

 

शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता गुणगौरव सोहळा समारंभ संपन्न होणार असून १०.३० वाजता स्थानिक कलाकारांचा कलाविष्कार qदडी भजन सोहळा हा कार्यक्रम होणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *