हनुमान जयंती निमित्त पिरावाडी येथे विविध कार्यक्रम

0 minutes, 1 second Read

 

आचरा–अर्जुन बापर्डेकर

श्री हनुमान मंदिर न्यास व श्री तरुण संघ दक्षिण वाडा आचरे पिरावाडी यांचे वतीने पिरावाडी-दक्षिणवाडा येथील हनुमान मंदिरात प्रतिवर्षा प्रमाणे हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक सामाजिक व शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्री हनुमान मंदिर न्यास पिरावाडी दक्षिणवाडाच्या वतीने वतीने करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुधवार दिनांक01 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता श्रींची आरती रात्री साडेसात वाजता पालखी मिरवणूक साडेनऊ वाजता मान्यवरांचा सत्कार सोहळा तर रात्री ठीक दहा वाजता वार्षिक शिष्यवृत्ती वितरण आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभ तसेच ठीक साडेदहा वाजता स्थानिक महिलांचा नृत्याविष्कार.

तर गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता हनुमान जन्म सोहळा आरती तीर्थप्रसाद सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा आरती तीर्थप्रसाद दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद तर सायंकाळी सात वाजता श्रींची महाआरती त्यानंतर सुस्वर भजन व रात्री दहा वाजता श्री मुजफ्फर मुजावर पुरस्कृत श्री स्वामी समर्थ डान्स ग्रुप मालवण यांचा नृत्य नजराणा आयोजित केलेला आहे.

तरी सदर कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष श्री हनुमान मंदिर न्यास व श्री तरुण संघ दक्षिणवाडा पिरावाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *