कणकवलीत शहर विकास आघाडीचा दमदार प्रचार ; संदेश पारकरांचे भावनिक आवाहन

भ्रष्टाचार, पैशांचे वाटप आणि विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

कणकवली |कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून शहर विकास आघाडीच्या उमेदवार संदेश पारकर यांनी जनतेसमोर विकासाचा मुद्दा घेऊन जोरदार प्रचार केला. कणकवली शहर विकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करताना त्यांनी भावनिक साद घालत शहराच्या सर्वांगीण विकासाची हमी दिली.

पारकर म्हणाले , कणकवली शहर विकास आघाडी या नावाखाली सर्व पक्ष एकत्र आले आहेत. लोकांनी परिवर्तनाला साद घातली आहे. आमदार निलेश राणे आल्यानंतर कणकवली भयमुक्त झाले असून आता भ्रष्टाचारमुक्त कणकवली घडवायची जबाबदारी जनतेची आहे.दरवर्षी येणारे कोट्यवधी रुपयांचे निधी, ४०० कोटींच्या कामांचे काय ? जनतेचा पैसा कुठे गेला ? कोणाच्या घरात गेला . हे आज सर्वजण विचारत आहेत.”

पारकर म्हणाले, कणकवलीची जनता विकली जाणार नाही. कितीही प्रलोभने आली तरी येथे सुज्ञ आणि स्वाभिमानी मतदार आहेत. मला एकदा संधी द्या, मी दुपटीने विकास करून दाखवेन. ही माझी शेवटची निवडणूक आहे.

शहर विकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रचारसभेत सत्ताधाऱ्यांवर टीका करत जनतेसमोर बदलाचा मुद्दा ठळकपणे मांडला.पालकमंत्री जिल्ह्याचे असल्याने विकासनिधी कणकवलीकडे येणारच. पण लोकांची जबाबदारी स्वीकारली तर न्याय देणे आमची जबाबदारी. कणकवलीला विकासाचे झुकते माप आम्ही मिळवून देऊ.

विकासाचा मुद्दा संपला की पैशांचे वाटप सुरु होते. पण लक्ष्मी आली तर घेऊ शकता . कारण ते तुमचेच पैसे आहेत. मात्र मत देताना सत्ता परिवर्तनालाच साथ द्या. विजय १०० टक्के आहे, शहर विकास आघाडी सक्षम पर्याय बनला आहे.

संदेश पारकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर तीव्र टीका करत म्हटले,जनतेचे लुटलेले पैसे दहा हजारात मत विकत घेण्याचा प्रकार सुरू आहे. ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. कणकवलीचे स्वाभिमानी मतदार पैशाला विकले जाणार नाहीत.

ते पुढे म्हणाले,शहर विकासाची ब्लूप्रिंट आमच्याकडे तयार आहे. पाच वर्षांत नियोजनबद्ध कामे करणार, भव्य क्रीडांगण, मल्टीपरपज प्रकल्प उभारणार. कणकवली शहराचा शाश्वत विकास करणे हे आमचे ध्येय आहे.आठ वर्षांत लुटलेले पैसे वाटण्याचा प्रकार सुरू आहे. पराभवाची चाहूल लागल्याने पैसे वाटले जात आहेत.

पण कणकवलीची जनता जागरूक असून पैशाचा बाजार मांडणाऱ्यांना योग्य उत्तर देणार.मतदार राजा आहे ; पैशाने विकत घेऊ हा गोड गैरसमज आहे. शहर विकास आघाडीच शहरात विजयाचा गुलाल उधळेल, असा ठाम विश्वास पारकर यांनी व्यक्त केला.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *