कणकवलीचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता भाजपमध्ये – मंत्री नितेश राणे 

पालकमंत्री नितेश राणेंकडून खळा बैठकांचा सपाटा :- विविध प्रभागातील नागरिकांशी संवाद 

कणकवली (प्रतिनिधी)

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवकपदाच्या भाजप उमेदवारांना निवडून द्या. भाजपकडे विकासाचे व्हिजन आहे. कणकवली न. पं. क्षेत्राच्या विकासासाठी मीच निधी देणार आहे. विरोधक सुद्धा तेच म्हणताहेत सत्तेवर आल्यावर निधीसाठी पालकमंत्र्याकडे जावु.

त्यामुळे त्यांचे काम करण्याअगोदर पहिल्यांदा भाजपच्या नगरसेवकांचे होईल. म्हणून इकडे-तिकडे विचार करण्यापेक्षा भाजपच्या उमेदवारांना मतदान म्हणजे नितेश राणेंना मतदान समजून मतदान करा, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रभाग क्रमांक ११, १३, १४ मध्ये खळा बैठका घेत सपाटा लावला आहे. यावेळी नगरसेवकपदाचे उमेदवार गणेश उर्फ बंडू हर्णे, विश्वजित रासम, मयुरी चव्हाण, मिलिंद मेस्त्री, राजन परब, विराज भोसले, डॉ. बी.जी. शेळके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे म्हणाले, राज्यातील महायुती सरकारमध्ये मी मंत्री आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत क्षेत्रातील विकास करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मी पालकमंत्री आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत क्षेत्रातील विकास करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मी निधी देणार आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या टीमने शहराच्या विकासासाठी चांगले काम केले आहे.

शहरात रस्त्याचे जाळे विणले असून पर्यटनवृद्धीसाठी गणपतीसाना येथे बारमाही धबधबा, क्रीडासंकुल यासह पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहे. कणकवलीचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता भाजपमध्ये आहे. त्यामुळे भाजपच्या हातीच शहरवासीयांना सत्ता द्यावी, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *