Maharashtra politics : ‘…तर महायुतीमधून बाहेर पडणार’; बड्या नेत्याचा थेट इशारा

मुंबई, सुष्मिता भदाणे, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असतानाच ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.