होय…मी नगराध्यक्ष होणार ही काळया दगडावरची पांढरी रेष – समीर नलावडे

राणेंचा शिलेदार म्हणून कणकवलीतील जनता माझ्या पाठीशी 

 

कणकवली (तुळशीदास कुडतरकर) कणकवली नगरपंचायतीचा मी नगराध्यक्ष होणार ही काळया दगडावरची पांढरी रेष आहे कारण दस्तूर खुद्द आमचे नेते खासदार नारायण राणे हे आमच्या पाठीशी आहेत.राणेंचा शिलेदार म्हणून कणकवलीतील जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना महत्व देण्याची मला गरज नाही. ही जनताच मला नगराध्यक्षपदी विराजमान करणार आहे. असे ठामपणे कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी सांगितले.

कणकवली नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपा पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी प्रचार यंत्रणा जोरदार राबविली आहे. प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली.

खा. नारायण राणेंचा सर्व उमेदवारांना आशीर्वाद

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी मी आणि आमच्या उमेदवारांनी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. खा. नारायण राणे यांचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत खा. राणेंचा मला व माझ्या उमेदवारांना पाठिंबा आहे. कणकवली शहरातील जनता खा. राणेंना मानणारी आहे. त्यामळे यंदाच्या निवडणुकीत न. पं. वर भाजपचा झेंडा फडकणार

भाजपं विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत आहे

कणकवली नगरपंचायतीची पाचवी निवडणूक भाजपं विकासाच्या मुद्यावर लढवत आहे. प्रचारादरम्यान खा. नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांचे शहर विकासाचे व्हिजन आम्ही मतदारापर्यंत पोहोचवत आहोत. भाजपच्या प्रचाराला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभागनिहाय होणाऱ्या भाजपच्या खळा बैठकांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांचा हा प्रतिसाद पाहता भाजपचे सर्वच उमेदवार बहुमतांनी निवडून येतील, ही काळ्यादगडावरील पांढरी रेघ आहे. विकासाचे व्हिजन मतदारांसमोर आहे.

समीर नलावडे म्हणाले, खास. नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून झालेला विकास जनतेसमोर आहे. त्यामुळे कणकवलीची जनता आमच्या सोबत आहे.निवडणुका सुरु झाल्या की विरोधकांचे काही ठरलेले आरोप असतात. विकास झाला नाही, भ्रष्टाचाराच झाला आहे असे आरोप म्हणजे विरोधकांच्या प्रचाराचा एक भाग आहे .त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना मी किंमत देत नाही.

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांनी भाजपच्याविरोधात फेक नैरिटिव्ह पसरविला जात आहे. मात्र, विरोधकांच्या या नैरिटिव्हला कणकवली शहरवासीय बळी न पडता भाजपच्या कमळ निशाणीला मतदान करतील, असा विश्वास समीर नलावडे यांनी व्यक्त केला.

सूक्ष्म नियोजन करूने प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. नगराध्यक्षपदाचा मी उमेदवार असून नगरसेवकपदाच्या उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. उमेदवार हे प्रभागाचे विकासाचे व्हिजन मतदार समोर मांडत आहेत. त्यामुळे ३ डिसेंबर रोजी भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा समीर नलावडे यांनी व्यक्त केला.कणकवली नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडविण्यासाठी पक्षाकडून शहरात प्रचार जोरात सुरु आहे.

*… तर राजकारण सोडेन*

पाच वर्षाच्या कालावधीत कणकवली शहरातील एखाद्या तरी नागरिककडून पैस घेतल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखविल्यास मी राजकारण सोडून देईल, असे चॅलेंज समीर नलावडे यांनी विरोधकांना दिले आहे.

..या आरोपांना कणकवलीची जनता दोन डिसेंबरला मतदानरुपी उत्तर देईल

नगराध्यक्षपदाच्या कालावधीत मी नागरिकांकडून दाखल्यांसाठी पैसे घेतले अथवा दाखल्यांसाठी अडवणूक केली अशा प्रकारचा आरोप करणाऱ्यांनी आम्ही केलेला विकास हा जनतेसमोर असल्याने विरोधकांकडे ‘विकासाचे मुद्दे नाहीत म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी ते नाहक आरोप करत आहेत.या आरोपांना कणकवली जनता दोन डिसेंबरला मतदानरुपी उत्तर देईल आणि नगराध्यक्षपदी मी.. आणि आमचे १७ ही नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास समीर नलावडे यांनी व्यक्त केला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *