वैभववाडी (प्रतिनीधी )
वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे गावातील आचिर्णे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्वेहसंमेलन व पारितोषिक सोहळा २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित केला आहे . स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुनांना वाव मिळावा या दृष्टीकोणातून दरवर्षी हा सोहळा ठेवण्यात येतो .
तसेच संस्थेचे अध्यक्ष मा . श्री . विजय रावराणे प्रमुख पाहुणे मा .श्री . यशवंत रावराणे तसेच विशेष उपस्थिती मा . श्री . महेश गोखले आणि आचिर्णे कॉलेजचे प्राचार्य श्री . प्रसाद फोंडके तसेच संस्थेचे कार्यकारी मंडळ कार्यक्रमाला उपस्थित राहतील . तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी ही या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती महाविद्यालय व्यवस्थापन कमिटीने केली आहे .
