मळेवाड येथे अवैधपणे साठा केलेले खनिज महसूल कडून जप्त

सावंतवाडी (प्रतिनिधी)

 

मळेवाड कोंडुरे येथे जांभळीचे भरड येथील शेणमळी येथे जागा अकृषिक न करता विना परवाना खनिज साठा करून ठेवलेला असून आज मळेवाड तलाठी अनुजा भास्कर यांनी कोंडुरे पोलिस पाटील बाबुराव मुळीक, व जमीन मालक सदाशिव परब यांच्या समवेत घटनास्थळी जात पंचनामा केला.यावेळी 500 ब्रास खनिज साठा अकृषिक परवाना नसलेल्या जमिनीत साठवून ठेवला असल्याचे दिसून आले.

 

सदर साठा महसूल विभागाने जप्त करून कोंडुरे पोलिस पाटील मुळीक व जमीन मालक सदाशिव परब यांच्याकडे ताबा पावतीने ताब्यात दिला असून सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात येणार आहे असे तलाठी भास्कर यांनी सांगितले.

 

मळेवाड कोंडुरे गावासह आजुबाजूच्या गावात होऊ घातलेल्या मायनिंग प्रकल्पाला पंचक्रोशीतील गावांचा जोरदार विरोध असताना आता मायनिंग व्यावसायिक गावात असे प्रकार करत असल्याने तीव नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *