जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे उमेदवार प्रचारात आघाडीवर ; कुणकेश्वर गटात गणेश गावकर, गणेश वाळके तर मुणगे गणातून दिपक कदम रिंगणात

0 minutes, 0 seconds Read

देवगड (प्रतिनिधी)

 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ७ फेब्रुवारी रोजी होऊ घातल्या असून या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर जिल्हा परिषद गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार गणेश जगदीश गावकर, तसेच पंचायत समिती कुणकेश्वर गणातून गणेश वाळके आणि मुणगे पंचायत समिती गणातून दिपक कदम हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

प्रचारासाठी अवघे मोजकेच दिवस उपलब्ध असतानाही उबाठा शिवसेनेच्या या तिन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून विकासाचे स्पष्ट व्हिजन घेऊन आम्ही जनतेसमोर उतरलो आहोत, अशी भूमिका उमेदवारांकडून मांडली जात आहे.

रस्ते,पाणी,वीज यासारख्या मूलभूत सुविधांसह विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,असे आश्वासन उमेदवार देताना मतदार संघातील स्थानिक व्यक्तीला आम्ही उमेदवारी दिली असल्याने त्यांना काम करण्याची संधी द्या .असेही ते आवर्जून मतदार बांधवांना सांगत आहेत.

मिठबाव, कातवण, कुणकेश्वर, मुणगे, खुडी या भागांमध्ये प्रचारात त्यांनी विशेष आघाडी घेतली असून स्वतः तिन्ही उमेदवार प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन थेट संपर्क साधताना दिसत आहेत.

या प्रचार दौऱ्यावेळी उमेदवारांसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असून त्यामध्ये संजय वाळके, अजय नानेरकर, नारायण वागड, गजेंद्र वाळके, मनोज गावकर, स्वप्निल तोडणकर, अमित तोडणकर, तुकाराम गावकर, विवेकानंद कातवणकर, बबन घाडी आदींसह उबाठा शिवसेना व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार यंत्रणेत सक्रिय झाले आहेत.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *