देवगड (स्वप्नील लोके) १६ ऑगस्ट २०२४
देवगड येथील कॅरम स्पर्धेत विकास कुलकर्णी व आराध्य चौगुले प्रथम ; स्वातंत्र्य दिनानिमित्त हनुमान युवक क्रिडा मंडळ, देवगडच्या वतीने केले होते आयोजन
हनुमान युवक क्रिडा मंडळ,देवगड आयोजित कॅरम स्पर्धेमध्ये खुल्या गटामधून विकास वसंत कुलकर्णी तर शालेय गटामधून आराध्य विशाल चौगुले प्रथम यांनी प्रथम क्रमांक मिळविला.७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हनुमान युवक क्रिडा मंडळ देवगडच्यावतीने १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्राथमिक शिक्षक भवन देवगड येथे खुल्या व शालेय गटात कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेचे उद्घाटन अविनाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी उद्योजक हनीफ शेठ मेमन,देवगड जामसंडे नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ साक्षी प्रभू, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे सर्वश्री जिल्हा उपाध्यक्ष श्री दयानंद तेली,जिल्हा महिला सचिव सौ. दीक्षा तेली,देवगड तालुका महिला अध्यक्षा सौ शामल जोशी, सौ. हर्षा ठाकूर,सिंधुरक्त मित्र संघटना देवगड तालुका सचिव श्री. प्रकाश जाधव तसेच जामसंडे तलाठी कार्यालयाचे तलाठी श्री. संतोष डांगे उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये खुला गटात – प्रथम क्रमांक विकास वसंत कुलकर्णी, द्वितीय क्रमांक योगेश आनंदा कोळी,उत्तेजनार्थ संदीप राणे व प्रकाश प्रभू. तर शालेय गटात – प्रथम क्रमांक आराध्य विशाल चौगुले,द्वितीय क्रमांक आकाश रामू वडार,उत्तेजनार्थ फरहान जुबेर होलसेकर व सावेज कमालुद्दीन शेख आदींनी यश संपादन केले.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके मंडळाच्या वतीने देण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष विलास रुमडे ,सदानंद सावंत,विजय जगताप,विनोद मेस्त्री,शरद लाड,ऊल्हास मणचेकर, सुरेंद्र लांबोरे,गुडेकर सर शिवा पेडणेकर व मंडळाचे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री विलास रुमडे यांनी केले तर सूत्रसंचालन सचिव श्री शरद लाड यांनी तर उपस्थितांचे आभार विलास रूमडे,यांनी व्यक्त केले.
