करिअर कट्टा महाविद्यालयीन प्रोत्साहन स्पर्धेत कट्टा महविद्यालायचे यश

0 minutes, 0 seconds Read

 

मालवण (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये करिअर विषयी सजकता निर्माण व्हावी या उद्देशाने महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा विभाग कार्यरत आहे. या विभागांतर्गत उद्योजक आपल्या भेटीला व आय.इ.एस.आपल्या भेटीला यासारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले जाते. या अनुषंगाने राज्यस्तरीय महाविद्यालयीन “करिअर कट्टा” प्रोत्साहन स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या स्पर्धेत आमच्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचालित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाने घवघवीत यश संपादित केले आहे. करिअर कट्टा विभागाने चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात करिअर विषयी राबविलेल्या विविध उपक्रमांच्या पीपीटी चे सादरीकरण महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभागाच्या समन्वयक प्रा. श्रुती कुंभार यांनी केले होते. या स्पर्धेत महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय प्राचार्य म्हणून तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा उत्कृष्ट प्राचार्य म्हणून गौरव करण्यात आला आहे. तर महाविद्यालयाच्या करिअर कट्टा समन्वयक प्रा. श्रुती कुंभार यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक म्हणून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ऍड.एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनिल नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रविंद्र पावसकर, सर्व संस्था संचालक महाविद्यालयाचे उपप्राचार्य रविंद्र गावडे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *