कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दर्जेदार उपचारांची सुविधा रुग्णांनी शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा ; दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार – डॉ. विशाल रेड्डी

कणकवली | सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे व सामाजिक कार्यकर्त्यांसोबत काही दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील आवश्यक सोयी-सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने तातडीने निर्णय घेत उपजिल्हा रुग्णालयात विविध सुधारणा राबविण्यात आल्या असून सध्या रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात […]

नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना मातृशोक सुनंदा लक्ष्मण पवार यांचे दुःखद निधन ; 29 डिसेंबर रोजी

  सुनंदा लक्ष्मण पवार यांचे दुःखद निधन ; 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ येथे अंत्यसंस्कार   कणकवली ( प्रतिनिधी)   जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेतील नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या आई सुनंदा लक्ष्मण पवार ( वय 83, मूळ रा. पुरळ, ता. देवगड, सध्या रा. कुडाळ ) यांचे वृद्धापकाळाने कुडाळ येथील राहत्या घरी रविवार 28 […]

पालकमंत्री नितेश राणे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी  (प्रतिनिधी)   राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता : ओम गणेश निवासस्थान कणकवली येथून मोटारीने वैभववाडी कडे प्रयाण सकाळी 9:30 वा : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित वैभववाडी […]

कुडाळ येथे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे सुदर्शन क्रिया शिबिराचे आयोजन 

नववर्षाचा निरोगी जीवनाचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा संकल्प ; 22 जानेवारीला आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकर रत्नागिरीत    कुडाळ (प्रतिनिधी) नविन वर्षात उत्साही आनंदी, निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगण्याचे रहस्य उलघडवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आनंद अनुभुती शिबीराचे ३१ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ओंकार डिलक्स कार्यालय, एसआरएम […]

समाजघडण घडवणारे शिक्षण घ्या – तहसीलदार आर. जे. पवार यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

देवगड (प्रतिनिधी) आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता, समाजाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावेल असे समाजोपयोगी शिक्षण घ्यावे, असे आवाहन देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले. ते मिठबाव येथील क्षात्रोकुलोत्पन्न मराठा समाज संचलित रामेश्वर हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव व अध्यापक महाविद्यालय, मिठबावच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.   […]

सावंतवाडी नगरपालिका नूतन नगराध्यक्षा युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांचा सिंधुदुर्ग ब्राह्मण मंडळ शाखा सावंतवाडीच्या वतीने सत्कार

सावंतवाडी {प्रतिनीधी} सावंतवाडी नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांचा सिंधुदुर्ग ब्राह्मण मंडळ, शाखा सावंतवाडी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक अभिनंदन करण्यात आले. नगरपालिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर समाजाच्या विविध घटकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी युवराज लखमराजे भोसले, बाळ पुराणिक (जिल्हा कार्यवाह, महाराष्ट्र ब्राह्मण […]

मळेवाड येथे तीन गाड्यांवर महसूलची कारवाई ; दोन आयवा व एक डंपरचा आहे समावेश

सावंतवाडी | दोडामार्गहून रेडीच्या दिशेने मायनिंग सदृश्य माती घेऊन जाणाऱ्या दोन आयवा व एका डंपरने होणारी वाहतूक मळेवाड जकातनाका येथे ग्रामस्थांनी रोखली. सदर गाड्यांमधून नेमकी कशाची वाहतूक होते? कुठून माल आणला व कुठे उतरण्यात येणार आहे?याबाबत विचारणा केली असता संबंधित गाडी चालकाकडून विसंगत उत्तरे देण्यात आली. यावेळी महसूल चे भरारी पथक मळेवाड जकातनाका येथे दाखल […]

मडुरा हायस्कूलची विविध स्पर्धेत विजयी घोडदौड

  बांदा (मंगल कामत) बांदा येथे पार पडलेल्या डॉ. व्ही. के. तोरसकर क्रीडा स्पर्धा व पं. नेहरू स्मृती वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुल मडुराच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून विजयी घोडदौड कायम ठेवलीआहे. मराठी विभाग मध्ये कु. निधी कृष्णा किडजी (8वी ) उत्कृष्ठ वक्तृत्व शैलीसह प्रथम क्रमांक पटकवला. लहान गटात कु. आस्था रघुनाथ वेंगुर्लेकर प्रथम […]

आचिर्णे माळावर अचानक लागलेल्या आगीत सुमारे ५० एकर ऊस जळून खाक

  वैभववाडी (प्रतिनिधी)      वैभववाडी फोंडा रस्त्यालगत आचिर्णे माळावर अचानक लागलेल्या आगीत सुमारे ५०  एकर ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हातात आलेले पीक असे डोळ्यादेखत जळून खाक झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.          वैभववाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते. तालुक्यात गेल्या आठ दहा दिवसापासून ऊस […]

सेवानिवृत्त शिक्षकाच्या पिशवीतील १ लाखाची रोकड लंपास

  कणकवली (प्रतिनिधी)   शिवाजीनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत शंकर साटम (७६) यांच्या पिशवीतील १ लाख रुपयांची रोकड आठवडयात बाजारात हातचालखीने अज्ञाताने लंपास केली. ही घटना मंगळवार सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत घडली. चोरीच्या प्रकारानंतर शुक्रवारी शशिकांत साटम यांनी कणकवली पोलीस गाठले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.   याबाबत […]