ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे येथे आहे बाबत प्रशिक्षण शिबिर संपन्न

सावंतवाडी – ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून गावातील शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांकरिता एआय बाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा पहिला ए आय जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान विकसित असून आपल्या दैनंदिन कामाबरोबरच इतर गोष्टींमध्ये उपयुक्त माहिती मिळण्यासाठी एआय तंत्रज्ञान हे खूपच उपयुक्त ठरते.

तालुका स्तरावर गावातील अंगणवाडी सेविका,आरोग्य सेवक व शिक्षक यांनी ए आय बाबत प्रशिक्षण घेतले होते.मात्र गावातील इतर शासकीय,निमशासकीय ग्रामपंचायत कर्मचारी यांना ए आय बाबत माहिती मिळावी यासाठी ज्यांनी ए आय चे प्रशिक्षण घेतलेले आहे.अशा कर्मचाऱ्यामार्फत ग्रामपंचायत कडून प्रचार व प्रसिद्धी व माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या शिबिरात उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी आरोग्य सेवक गावडे,अंगणवाडी सेविका पूर्वा नाईक,शिक्षक बोळेगावे यांनी उपस्थितांना ए आय बाबत मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, आदिशक्ती अध्यक्ष ज्योती शिरसाठ, सी आर पी, आशा,शिक्षक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, महिला उपस्थित होत्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *