पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक

0 minutes, 0 seconds Read

 

बांदा (प्रतिनिधी) 

पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक

बांदा दोडामार्ग राज्यमार्गावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, बांदा फुकेरी बस फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने येत होती. ती बस पानवळ येथे आली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या उस्मानाबाद पणजी बसची समोरून जोरदार धडक फुकेरी बसला बसली. बस चालकाने ब्रेक लावत बस वर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र बस भरधाव वेगात असल्याने धडक बसल्यावर सुद्धा जवळपास तब्बल 100 फूट फुकेरी बसला फरफटत नेले. या अपघातात फुकेरी बस मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्यात. सर्व जखमीना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *