सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने कळसुलकर हायस्कूलमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन

0 minutes, 0 seconds Read

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने कळसुलकर हायस्कूलमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला अध्यक्षा प्रा. सुषमाताई हरकुळकर आहेत. तर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विजयालक्ष्मी चिंडक या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

८ मार्चला सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत हा मेळावा होणार असून यावेळी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, सचिव संजय पेंडूरकर, कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, सावंतवाडी अध्यक्ष विजय नेमळेकर, सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, कोषाध्यक्ष सुनील जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी तालुकाध्यक्ष मीनाक्षी तेंडोलकर, जिल्हा सरचिटणीस अपूर्वा पवार, कणकवली अध्यक्ष आशा भोसले, मालवण अध्यक्ष नेहा काळसेकर, दोडामार्ग अध्यक्ष राजश्री आयनोडकर, जिल्हा उपाध्यक्ष (समता सैनिक) दिलीप तरंदळेकर, रविना कांबळे, कोषाध्यक्ष कणकवली, वैष्णवी कदम, अध्यक्षा वेंगुर्ले, अंकिता कदम, अध्यक्ष, कुडाळ, प्रीतम जाधव यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *