oplus_0

शिवप्रसाद पेडणेकर मित्र मंडळातर्फे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्याने प्रवीण सावंत यांचा सत्कार

0 minutes, 4 seconds Read

वाहतूक पोलीस म्हणून प्रवीण सावंत यांची कौतुकास्पद कामगिरी ! डॉ सुनील आठवले

 

देवगड (हेमंत पेडणेकर)

 

शिवप्रसाद पेडणेकर मित्र मंडळ (SWF), देवगड तालुका गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही प्रसिद्धीचा गाजावाजा न करता विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. समाजातील तळागाळातील घटकांच्या समस्या ओळखून त्या सोडवण्यासाठी मंडळाने वेळोवेळी मोलाची भूमिका बजावली असून, सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.

 

विशेषतः दिविजा आश्रम, सविता आश्रम यांसारख्या वयोवृद्धांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना वेळोवेळी विविध स्वरूपाची मदत शिवप्रसाद पेडणेकर मित्र मंडळाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने समाजोपयोगी उपक्रम राबवित असतानाच, समाज घडवणाऱ्या पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याची परंपरा मंडळाने सातत्याने जपली आहे.

 

या उपक्रमाचाच एक भाग म्हणून देवगड परिसरात वाहतूक शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेणे, नागरिकांना नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे तसेच अपघाताच्या प्रसंगी रात्री-अपरात्री मदतीला धावून जाण्यामुळे परिचित असलेले सध्या वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या प्रवीण सावंत यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल  कार्याची दखल घेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

हा सत्कार समारंभ देवगड मेडिकल फाउंडेशन, डॉ. आठवले कॅम्पस येथे उत्साहात पार पडला. यावेळी शिवप्रसाद पेडणेकर, अभिराम देसाई, जितेंद्र पिसे, डॉ. सुनील आठवले, डॉ. सौ. मंजुषा आठवले, डॉ. तन्मय आठवले, डॉ. रिया जैन आठवले तसेच व्यापारी वर्गातील सदस्य आणि देवगड मेडिकल फाउंडेशनचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवप्रसाद पेडणेकर यांनी केले. सत्कारप्रसंगी डॉ. सुनील आठवले यांनी श्री. प्रवीण सावंत यांच्या सामाजिक कार्याचे मनःपूर्वक कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

समाजहितासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अशा उपक्रमांमधून घडते, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

oplus_4194304

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *