स्वामींच्या दर्शनाने प्रत्येकवेळी नवी ऊर्जा मिळते ; आमदार चित्राताई वाघ यांचे अक्कलकोट येथे प्रतिपादन

0 minutes, 0 seconds Read

अक्कलकोट | आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त असून प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता येथे भेट दिल्यानंतर स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक वेळी नवीन स्फूर्ती मिळते. त्यामुळे भावी वाटचालीत काम करण्याकरिता स्वामी दर्शनाने दरवेळी मिळणारे अनुभव नेहमीच प्रेरणा देत असतात, असे मत महाराष्ट्र विधान परिषद आमदार चित्रा ताई वाघ यांनी व्यक्त केले.

त्या नुकत्याच श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता येथे आल्या असता बोलत होत्या. याप्रसंगी वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार चित्राताई वाघ यांचा श्रीफळ, उपरणे, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.

यावेळी प्रथमेश इंगळे, शहाजी पवार, मंदिर समिती सचिव आत्माराम घाटे, विश्वस्त महेश गोगी, संतराम शिंदे, उज्ज्वलाताई सरदेशमुख, श्रीशेल गवंडी, प्रसाद सोनार, संजय पवार, संतोष परुळे, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडस आदी उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *