देवगड (प्रतिनिधी)
मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने तुळशी विवाहाचा वार्षिक उत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार, पूजन विधी आणि मंगलाष्टकांच्या गजरात हा सोहळा संपन्न झाला.
श्री देव रामेश्वर मंदिराचा वार्षिक उत्सवानुसार तुळशी विवाह सोहळा आज दिमाखात संपन्न झाला. पूर्व पारंपारिक रितीरिवाद्यानुसार खंडित झालेल्या वार्षिक उत्सवाची रीत शिवकळेच्या आदेशानुसार जाणून घेत चार तुळशींच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये श्री देव रामेश्वर मंदिर परिसरातील तुळस, मांडावरची तुळस, बाराचा पूर्वज आणि बाराची तुळस या पारंपरिक दैविक स्थान असलेल्या ठिकाणी असलेल्या तुळशी वृंदावन स्थळी विधिपूर्वक तुलसी-विवाह सोहळा कार्यक्रम पार पडले.
या मंगल सोहळ्याच्या निमित्ताने मिठबावसह तीनही गावांतील ग्रामस्थ, गावघर रयत, महिला व तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित राहिली.या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित रयतेनेही मंगलाष्टके सादर करत उत्सवाला एक वेगळी रंगत आणली.तुळशी विवाह सोहळ्याने श्री देव रामेश्वर मंदिरातील वार्षिक उत्सवाला अनोखी भक्तिमय झळाळी प्राप्त झाली.
