महाविस्तारच्या डिजीटल संजीवनीने शेतकरी होणार हायटेक

डॉ. बापूसाहेब लांबाडे यांनी शिरगांवच्या कर्ले महाविद्यालयात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन शिरगांवः पारंपारिक शेतीला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे ग्रामिण भागातील शेतकरी हायटेक होणार असून कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार AI ॲप डिजीटल संजीवनी ठरणार असून यातून कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. असे मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी डॉ.बापूसाहेब लांबाडे यांनी शिरगांव येथे केले पुंडलीक […]

कासार्डे विजयदुर्ग मार्गावर ट्रॅक दुचाकी अपघात ; दुचाकीवरील दोघे जागीच ठार

देवगड/ प्रतिनिधी कासार्डे- विजयदुर्ग राज्य मार्गावर वेळगिवे हद्दीतील धोकादायक वळणावर ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात देवगड तालुक्यातील पाटगाव येथील दुचाकीस्वारासह दोघेजण जागीच ठार झाले. सुधाकर सिताराम गुरव (वय ४०, रा. पाटगाव गावठण) व अनंत बाबला गुरव (वय ६०, रा. पाटगाव बाणेवाडी) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात रविवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास […]

शिरगांवच्या कर्ले महाविघालयात उद्या रक्तदान शिबीर

  शिरगांव : शिक्षक भारती सिंधुदुर्ग आणि देवगड तालुक्यातील पुंडलिक अंबाजी कर्ले कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते १ या वे ळेत पुंडलिक अंबाजी कर्ले कला वाणिज्य महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरास शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर उपस्थित रहाणार आहेत. रक्तदान […]

बिहार विधानसभा निवडणूक विजयाचा शिरगावमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

  देवगड (तुषार शिंगाडे) बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांनी मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद देवगड तालुक्यातील शिरगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष आणि घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा केला. परिसरात ‘भारत माता की जय’, ‘मोदीजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणा घुमल्या. यावेळी भाजपा जिल्हा […]

विशाखा साटम यांना ईगल फाउंडेशनच्या राष्ट्रीय गरुड झेप पुरस्काराने सन्मानित

ग्रामिण भागातील शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव    शिरगांव (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील शिरगांव बाजारपेठ येथिल स्काय एज्युकेशन कोचिंग क्लासेसच्या प्राध्यापिका विशाखा साटम यांना ग्रामिण भागातील शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सांगली येथिल ईगल फाउंडेशनच्या राष्ट्रीय गरुड झेप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.   सांगली जिल्ह्यातील डॉ. अण्णासाहेब डांगे इंजिनियर कॉलेज,आष्टा येथे ९ नोव्हेंबर ईगल फाउंडेशनच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त विविध […]

विजयदुर्ग येथे १५ नोव्हेंबर रोजी मॅरेथॉन जलतरण स्पर्धा ; देशभरातून ५१ जलतरणपटूंचा सहभाग

वाघोटण खाडी मॅरेथॉन स्पर्धेचे सलग ५ व्या वर्षी केले आयोजन देवगड (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग येथे स्थापन केलेल्या अजिंक्य आरमाराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पर्यटन आणि जलक्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘जिम स्विमिंग अकॅडमी, कोल्हापूर’ व श्री दुर्गामाता कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, विजयदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वी वाघोटण खाडी मॅरेथॉन व अर्ध मॅरेथॉन जलतरण स्पर्धा […]

देवगड-जामसंडे शहर विकास आराखड्याचा खोटा सर्व्हे दाखवून भ्रष्टाचार

  उबाठा शिवसेना महिला तालुका संघटक सौ. हर्षा ठाकुर यांचा माजी नगराध्यक्ष चांदोस्कर यांच्यावर गंभीर आरोप ! ​देवगड /प्रतिनिधी देवगड-जामसंडे शहर विकास आराखडा बनवताना खोटा सर्व्हे दाखवून मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप उबाठा शिवसेनेच्या महिला तालुका संघटक सौ. हर्षा ठाकूर यांनी तत्कालीन नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांच्यावर केला आहे. त्यांनी प्रसिद्धीस निवेदनात म्हटले आहे की, देवगड-जामसंडे […]

सृष्टी पटेलचे विभागस्तरीय ज्युडो स्पर्धेत नेत्रदिपक यश ; १९ वर्षाखालील मुलीच्या गटात पटकाविला व्दीतीय क्रमांक 

शिरगांव : देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सृष्टी मणिलाल पटेल या विद्यार्थीनीने सांगली येथे पार पडलेल्या विभागीय ज्युडो स्पर्धेत नेत्रदिपक यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सांगली माधवनगर येथील शांतीनिकेतन संकुलात ५ नोव्हेंबर रोजी शालेय विभागस्तरीय ज्युडो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीत शिकणाऱ्या […]

देवगड निपाणी मार्गावर रस्ता खचल्याने ओव्हरलोड ट्रकला अपघात

देवगड निपाणी मार्गावर रस्ता खचल्याने ओव्हरलोड ट्रकला अपघात देवगड : देवगड नांदगाव या मुख्य मार्गावरील शिरगाव बाजारपेठ येथे रस्ता खचल्याने चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. रस्ता खचल्याने ट्रकची डावी बाजू खड्ड्यात कंलडली असून ट्रकच्या मागील चाकाचा भाग अर्धा या खड्ड्यात रुतला आहे. त्यामुळे शेजारीच असलेल्या चिरे व्यवसायिक कार्यालयांवर हा ट्रक कलंड्याची शक्यता आहे. मात्र […]

सुमारे 300 वर्षांनी अनुभवली मिठबाव श्री देव रामेश्वराच्या दरबारात त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सवाची अविस्मरणीय रात्र

  5000 पणत्यांनी उजळला श्री देव रामेश्वराचा मंदिर परिसर देवगड  (प्रतिनिधी) सुमारे तीनशे वर्षांनंतर मिठबाव गावात खंडित असलेल्या श्री देव रामेश्वराचा वार्षिकोत्सव पुनर्प्रारंभ झाला आणि त्यासोबतच त्रिपुरारी पौर्णिमेच्या जागरण सोहळ्याचा दिव्य थाट पुन्हा अनुभवायला मिठबाव,तांबळडेग, कातवण या तिन्ही गावच्या गाव घर रयतेला मिळाला.यावेळी आयोजित दीपोत्सवात सुमारे 5 हजार दीपप्रज्वलित केल्याने या सोहळ्याने गावातील प्रत्येकाच्या मनात […]