देवगड (तुषार शिंगाडे) बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांनी मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद देवगड तालुक्यातील शिरगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष आणि घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा केला. परिसरात ‘भारत माता की जय’, ‘मोदीजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणा घुमल्या.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मिलिंद साटम, सुभाष नार्वेकर, मंगेश लोके, महेश मेस्त्री, प्रकाश राणे, अजय परब, सुहास राणे, राजू साटम, सिद्धेश लोके, युवराज माळवदे, युधिराज राणे, संजय शिंदे, पोरे, विठोबा घाडी, पांडुरंग घाडी, आदित्य तावडे, महेश साटम आदी उपस्थित होते.
बिहारमधील विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील सरकारने केलेल्या विकासकामांमुळे जनतेतून मिळालेला विश्वास मतदारांनी दाखवून दिला आहे.या निकालामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे मत भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी व्यक्त केले.
