स्वच्छ सर्वेक्षणासाठी नागरीकांनी ऑनलाईन अभिप्राय नोंदवा गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण यांचे आवाहन

  देवगड (प्रतिनिधी) स्वच्छ सर्वेक्षणासाठी नागरीकांनी ऑनलाईन अभिप्राय नोंदवा गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण यांचे आवाहन स्वच्छ भारत मिशनच्या दुसर्‍या टप्प्यांतर्गत केंद्र शासनाने ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ अंतर्गत जिल्हातील जास्तीत जास्त लोकांनी अभिप्राय नोंदणी करणे गरजेचे आहे . त्यासाठी देवगड तालुक्यातील नागरिकांनी पुढाकार घेवून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण २०२५ ( SSG 2025 ) हे अॅप डाऊनलोड […]

मिलिंद सदानंद पवार शाळेत रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न

    देवगड (प्रतिनिधी)    मिलिंद सदानंद पवार शाळेत रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न देवगड एज्युकेशन बोर्ड संचालित, मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळा, चित्रकार प्रथमेश राजेंद्र हिंदळेकर (बालविभाग) यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड जामसंडे नगरपंचायत मर्यादित हद्दीतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन शनिवारी दिनांक १२ जुलै २०२५ रोजी करण्यात आले.   या स्पर्धेमध्ये देवगड जामसंडे […]

युनेस्कोच्या यादीत विजयदुर्ग किल्ला समाविष्ट झाल्याने विजयदुर्गवासियांची जबाबदारी वाढली – जिल्हाधिकारी अनिल पाटील

  देवगड (प्रतिनिधी)   युनेस्कोच्या यादीत विजयदुर्ग किल्ला समाविष्ट झाल्याने विजयदुर्गवासियांची जबाबदारी वाढली – जिल्हाधिकारी अनिल पाटील       विजयदुर्ग किल्ल्याची निवड युनेस्कोच्या यादीत झाल्याने पर्यायाने जागतिक वारसा स्थळात हा किल्ला समाविष्ट झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आनंद व्यक्त केला. आज त्यांनी विजयदुर्ग किल्ल्याला भेट दिली. त्यांच्या हस्ते विजयदुर्ग किल्ल्यातील भवानी मातेच्या मंदिरात भवानीमातेला […]

कोकण उर्दू हायस्कूल विजयदुर्गची बुशरा धोपावकर शिष्यवृत्ती परीक्षेत

  देवगड (प्रतिनिधी) कोकण उर्दू हायस्कूल विजयदुर्गची बुशरा धोपावकर शिष्यवृत्ती परीक्षेत कोकण उर्दू हायस्कूल, विजयदुर्ग या विद्यालयातील विद्यार्थिनी कु. बुशरा इम्रान धोपावकर हिने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून गुणवत्तायादीत स्थान प्राप्त केले आहे, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. कु. बुशरा हिच्या या यशामुळे शाळेचा नावलौकिक अधिक वाढला […]

देवगडसारख्या छोट्याशा भागातही उत्स्फूर्त सामाजिक कार्य ‘रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी – देवगड’ करीत असून ही बाब कौतुकास्पद – डिस्ट्रीक्ट गर्व्हनर अरुण भांडारे 

  देवगड (प्रतिनिधी) देवगडसारख्या छोट्याशा भागातही उत्स्फूर्त सामाजिक कार्य ‘रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी – देवगड’ करीत असून ही बाब कौतुकास्पद – डिस्ट्रीक्ट गर्व्हनर अरुण भांडारे  देवगडसारख्या छोट्याशा भागातही उत्स्फूर्त सामाजिक कार्य ‘रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी- देवगड’ करीत असून ही बाब कौतुकास्पद आहे. देवगडला कार्डीॲक ॲम्ब्युलन्सची आवश्यकता असून रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीच्यावतीने ही कार्डीॲक ॲम्ब्युलन्स उपलब्ध […]

देवगड येथील घरकुल प्रकल्पासंदर्भात आयोजित बैठकीत नगरपंचायत प्रशासन अधिकारी, नगरसेवकांनी फिरवली पाठ  लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त 

    देवगड / प्रतिनिधी देवगड येथील घरकुल प्रकल्पासंदर्भात आयोजित बैठकीत नगरपंचायत प्रशासन अधिकारी, नगरसेवकांनी फिरवली पाठ  लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त  देवगड- जामसंडे नगरपंचायत हद्दीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल प – कल्पासंदर्भात इंद्रप्रस्थ हॉल येथे पार पडलेल्या बैठकीत नगरपंचायत प्रशासन अधिकारी, नगरसेवकांनी पाठ फिरविली. त्यामुळे लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री नीतेश राणे […]

आजी-आजोबांच्या सान्निध्यात आदर्श ‘गुरुपौर्णिमा’ उत्सव!

  देवगड (प्रतिनिधी) आजी-आजोबांच्या सान्निध्यात आदर्श ‘गुरुपौर्णिमा’ उत्सव! पी.एम. श्री स्कूल जोशी विद्यामंदिर, जामसंडे नं. १ चा स्तुत्य उपक्रम कलात्मक, गुणात्मक आणि शैक्षणिक उपक्रमांत अग्रेसर असणाऱ्या पी.एम. श्री स्कूल जोशी विद्यामंदिर जामसंडे नं. १ येथे गुरुपौर्णिमा उत्सव एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांच्या हस्ते गुरूंचे चरणपूजन व वंदन करून गुरुपौर्णिमा […]

“गुरुपौर्णिमेनिमित्त धर्मरक्षणाचा निर्धार; सनातन संस्थेचा प्रेरणादायी महोत्सव सिंधुदुर्गात उत्साहात संपन्न”

  देवगड  (प्रतिनिधी) “गुरुपौर्णिमेनिमित्त धर्मरक्षणाचा निर्धार; सनातन संस्थेचा प्रेरणादायी महोत्सव सिंधुदुर्गात उत्साहात संपन्न” सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मालवण आदी ६ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी “अंतिम विजय धर्माचाच असतो, त्यामुळे गुरूंच्या आशीर्वादासाठी धर्माच्या बाजूने उभे राहा,” असे प्रभावी आवाहन सनातन संस्थेचे श्री. आनंद मोंडकर यांनी […]

बळीराजासाठी एक दिवस बांधावरची शाळा ; गुरुपौर्णिमेच्या दिवशी जिल्हा परिषद कातवणेश्वर शाळेचा आगळावेगळा उपक्रम

  देवगड (स्वप्नील लोके) बळीराजासाठी एक दिवस बांधावरची शाळा ; गुरुपौर्णिमेच्या दिवशी जिल्हा परिषद कातवणेश्वर शाळेचा आगळावेगळा उपक्रम       गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी जिल्हा परिषद कातवणेश्वर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी “एक दिवस बळीराजासाठी” हा नाविन्यपूर्ण आणि अनुभवात्मक उपक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीत नेऊन भात बी पेरणी, भात काढणी, भात लावणी ,मातीचा अनुभव घेणे अशा उपक्रमांत […]

देवगड महाविद्यालयाच्या दोन कॅडेट्सची थल सैनिक राज्यस्तरीय कॅम्पसाठी निवड ; एन.सी.सी. विभागाचा अभिमानास्पद क्षण

  देवगड (प्रतिनिधी) देवगड महाविद्यालयाच्या दोन कॅडेट्सची थल सैनिक राज्यस्तरीय कॅम्पसाठी निवड ; एन.सी.सी. विभागाचा अभिमानास्पद क्षण ५८ महाराष्ट्र बटालियन, ओरोस येथे मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एन.सी.सी. प्रशिक्षण शिबिरातून देवगड महाविद्यालयाच्या दोन कॅडेट्सची राज्यस्तरीय थल सैनिक कॅम्पसाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे संपूर्ण देवगड तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.     सार्जंट संभाजी जकाप्पा […]