आजी-आजोबांच्या सान्निध्यात आदर्श ‘गुरुपौर्णिमा’ उत्सव!

0 minutes, 2 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

आजी-आजोबांच्या सान्निध्यात आदर्श ‘गुरुपौर्णिमा’ उत्सव!

पी.एम. श्री स्कूल जोशी विद्यामंदिर, जामसंडे नं. १ चा स्तुत्य उपक्रम

कलात्मक, गुणात्मक आणि शैक्षणिक उपक्रमांत अग्रेसर असणाऱ्या पी.एम. श्री स्कूल जोशी विद्यामंदिर जामसंडे नं. १ येथे गुरुपौर्णिमा उत्सव एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांच्या हस्ते गुरूंचे चरणपूजन व वंदन करून गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी आदरणीय जोशी सर यांनी आपल्या मनोगतातून आजी-आजोबांचे आशिर्वाद हेच खरे गुरुतत्त्व असल्याचे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका श्रीमती तेली मॅडम यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी आजी-आजोबांचे महत्व विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरूप्रमाणे उलगडून सांगितले. यानंतर उपस्थित आजी-आजोबांनीही आपले मनोगत मांडत शाळेतील उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा आदरणीय अहिरे मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती मोंडकर मॅडम, घाडी मॅडम, सारंग मॅडम, निकिता परब मॅडम, बोडेकर सर, कांबळे सर, दळवी सर आणि संगीत शिक्षक पाटील सर यांनी विशेष मेहनत घेतली.

 

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती राजश्री मोंडकर मॅडम यांनी सुरेखरीत्या पार पाडले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *