इळये वरंडवाडी येथील युवक बेपत्ता

0 minutes, 0 seconds Read

इळये वरंडवाडी येथील युवक बेपत्ता

 

देवगड:प्रतिनिधी

 

इळये वरंडवाडी येथिल किरण मंगेश सावंत(२८) हा युवक बेपत्ता झाला आहे.याबाबतची तक्रार त्याचा आईने देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, इळये वरंडवाडी येथील किरण मंगेश सावंत हा युवक दि. १४ जुलै रोजी सकाळी ८ वा.सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता निघुन गेला. नातेवाईक, आजुबाजुच्या गावात व परिसरात त्याचा शोध घेवूनही तो मिळाला नाही म्हणून त्याची आई मनीषा मंगेश सावंत यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.याबाबत तपास पो.हे.कॉ.राजन जाधव करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *