देवगड (प्रतिनिधी) १८ ऑगस्ट २०२४
कोटकामते ग्रुप सोसायटी या संस्थेमधील चाललेल्या अनियमित कारभाराची सखोल चौकशी करा
देवगड तालुक्यातील कोटकामते ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित या संस्थेमधील चाललेल्या अनियमित
कारभाराची सखोल चौकशी करा व व दोषींवर कठोर कारवाई करा अशी तक्रार खुडी कोटकामते गावातील शेतकऱ्यानी सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.
या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की,
कोटकामते खुडी गावामधील शेतकरी कोटकामते ग्रुप वि. का. स. से.सो. मर्या. या संस्थेचे सभासद असून सदर संस्थेचा कारभार अनियमित असून दि. १२.०५.२०२४ रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेमधे चेअरमन यांनी माहीती दिल्या प्रमाणे १ करोड़च्या वर जिल्हा बैंकेची थकबाकी आहे. त्यात ५२ लाखाचा ताळमेळ बसत नाही, गेली २० ते २५ वर्ष सभासदांना नफा वाटप केले नाही. या कारणांने त्यात खुप मोठा आर्थिक अपहार साधारणपणे ५० लाख एवढ्या रक्कमेचा झाला आहे. तत्कालीन पदाधिकारी, सचिव, लेखा परिक्षक, यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे.तरी आपण विशेष लेखपरिक्षण करून सदर संस्थेचा गेल्या २० वर्षाचा लेखाजोखा तपासून दोषींवर कठोर कारवाही करावी असे या तक्रारीत नमूद केले आहे.
