देवगड तालुक्यातील विठ्ठल मंदिरात उद्या आषाढी एकादशी उत्सव

0 minutes, 0 seconds Read

देवगड तालुक्यातील विठ्ठल मंदिरात उद्या आषाढी एकादशी उत्सव

 

देवगड (प्रतिनिधी)१६ जुलै २०२४

 

आषाढी एकादशी उत्सवानिमित्त देवगड तालुक्यातील ठिकठिकाणीच्या विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटे ४ वाजता पाद्यपूजा,५ ते ६:३० काकड आरती,भाविकांना दर्शनास प्रारंभ,सकाळी ९ घटस्थापना व हरिनामाचा गजर,सायंकाळी ४ ते ५:३० तारामुंबरी महिला भजन दिंडी, सायंकाळी ५:३० ते ६ नृत्यप्रिया
इंन्स्टीट्युशन परफेक्ट बीट डान्स ग्रुप जामसंडे, सायंकाळी ६ ते ७ कोयंडे बंधू प्रासादिक भजन मंडळ कालवी बुवा गुणाजी कोयंडे यांचे भजन, सायंकाळी ७ साजंआरती,७:१५ स्थानिक भजने आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

तसेच देवगड बाजारपेठ, आनंदवाडी,
सह तालुक्यातील अनेक विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार आहे .

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *