कणकवलीत छत्रपतींच्या पुतळयास दुग्धाभिषेक ; शिवसेना ठाकरे गटाने केले भर पावसात आंदोलन; शासनाचा केला निषेध

0 minutes, 1 second Read

 

कणकवली दि २७ ऑगस्ट (तुळशीदास कुडतरकर)

 

कणकवलीत छत्रपतींच्या पुतळयास दुग्धाभिषेक ; शिवसेना ठाकरे गटाने केले भर पावसात आंदोलन; शासनाचा केला निषेध

 

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला आज शिवसेना ठाकरे गटाकडून भर पावसात दुग्धाभिषेक करत पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी ठाकरे गटाकडून राज्य सरकारचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” च्या घोषणा देत छत्रपतींचा जयघोष करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तेजस राणे, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सुदाम तेली सी आर चव्हाण, राजू राठोड प्रसाद अंधारी, मंगेश सावंत, महेश कोदे आदी उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *