अधिवेशनात मागण्यांचा विचार न झाल्यास येणाऱ्या जि.प.व पं.स.निवडणुकीत बहिष्कार टाकणार : कुणकेश्वर येथे पारंपारिक रापण संघाचा बैठकीत निर्धार

  कुणकेश्वर येथे तालुक्यातील रापण संघाची बैठक संपन्न   देवगड : प्रतिनिधी   रापण संघाच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असा आरोप करीत पारंपारिक रापण संघाच्या सभासदांना कुणकेश्वर येथे पारंपारिक बिगर यांत्रिक रापण संघाच्या बैठकीत रापण संघाच्या मागण्यांबाबत येत्या अधिवेशनात शासनाने विचार न केल्यास येणाऱ्या जि.प.व पं.स निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकणार असा निर्णय घेतला.कुणकेश्वर भक्तनिवास सभागृहात […]

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप होण स्वाभाविक – रवींद्र चव्हाण

महायुतीतील नेत्यांसोबत चर्चा घडलेल्या काही प्रकारावर पडदा बांदा | महायुतीमध्ये आम्ही एकत्रित सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेसाठी २०२९ पर्यंत राज्य व केंद्र सरकार सुरळीतपणे चालावं अशी धारणा आमची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीतील नेत्यांशी चर्चा झाली. घडलेल्या काही गोष्टींवर पडदा टाकण्याचा निर्णय झाला आहे अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. […]

मिठबाव श्री देव रामेश्वर पाच दिवसीय डाळपस्वारी 2025 ची रुपरेषा जाहीर

१३ ते १७ डिसेंबर : धार्मिक विधी, देवतरंग आणि पारंपरिक स्थळी भेटीगाठी देवगड : शतकानुशतके जोपासली गेलेली आध्यात्मिक परंपरा उजळून मिठबाव श्री देव रामेश्वर पाच दिवसीय डाळपस्वारी 2025 चे औपचारिक वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. १३ ते १७ डिसेंबरदरम्यान भक्तीमय वारी, वयक्तिक न्याय (मेळे), देवतरंग आणि सेवक भेटींच्या धार्मिक वातावरणात पंचक्रोशीतून हजारो भाविक सहभागी होणार […]

मळेवाड येथील गुरुनाथ शिरसाट यांचे निधन

  सावंतवाडी _ मळेवाड_मळेवाड शिरसाटवाडी येथील गुरुनाथ बाबुराव शिरसाट (वय 84) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सूना,नातवंडे असा परिवार आहे.गुरुनाथ शिरसाट हे उत्कृष्ट दुचाकी मेकॅनिक म्हणून प्रसिद्ध होते. मळेवाड येथील टेलर वसंत शिरसाट यांचे ते वडील होत. गुरुनाथ शिरसाट यांच्या एका मुलाचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते.त्यानंतर ते मयत मुलाची पत्नी श्रीमती […]

हडपीड वळणावर भीषण अपघात : दुचाकीस्वाराचा जागीच ठार , एक जखमी

  देवगड / प्रतिनिधी देवगड–नांदगाव महामार्गावरील हडपीड येथील कुलस्वामिनी मंदिराजवळील अवघड वळणावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार विनायक धोंडू पुजारे (वय २२, रा. कोटकामते आडिवरेवाडी) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहप्रवासी निखिल नारायण नवलू (वय २४) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर गोवा–बांबुळी येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळोशी वरचीवाडी येथील […]

आचरा रामेश्वर मंदिर येथे 7 डिसेंबर रोजी भक्तीरंग भरतनाट्यम नृत्याविष्कार

आचरा – अर्जुन बापर्डेकर श्री देव रामेश्वर मंदिर आचरा येथे रविवार 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता रागेश्री पारकर प्रस्तुत पारंपारिक भारत नाट्य नृत्याविष्कार भक्तिरंग सादर होणार आहे. गुरु आचार्य पार्वती कुमार आणि गुरु डॉक्टर संध्या पुरेच्या अध्यक्षा संगीत नाटक अकॅडमी यांच्या प्रेरणेने श्रीमती रागेश्री पारकर यांच्या संकल्पना आणि नृत्यदिग्दर्शनातून मानसी पराडकर आणि सायली वाळके […]

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन साध्य करण्यासाठी कठोर मेहनत आवश्यक – सदाशिव चिंदरकर

आचरा-अर्जुन बापर्डेकर सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपले भवितव्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन साध्य करण्यासाठी कठोर मेहनत घेण्याचे आवाहन चिंदर ग्रामोन्नती मंडळ मुंबई चे अध्यक्ष सदाशिव चिंदरकर यांनी भगवती मंदिर चिंदर येथे केले. भगवती माऊली यात्रोत्सवाच्या औचित्यावर चिंदर गावातील मुलांचा गुणगौरव सोहळा चिंदर ग्रामोन्नती मंडळ मुंबई तर्फे भगवती मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी त्यांच्या सोबत […]

चिंदर येथील भगवती माऊली देवीच्या जत्रोत्सवाला उत्साहात सुरुवात

आचरा–अर्जुन बापर्डेकर चिंदर येथील श्री देवी भगवती माऊली जत्रोत्सवास गुरुवार सकाळ पासूनच उत्साहात सुरूवात झाली.दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविकांनी गर्दी उसळली होती. सकाळी बारा पाच मानकरी जमल्या नंतर देवीला गा-हाणे घालून साडी चोळी सोन्याच्या दागिन्यांनी मढविण्यात आली.त्यानंतर बारा पाच मानक-यांचे नैवेद्य देवीला अर्पण करण्यात आले. यानंतर भाविकांचे नवस फेडणे ओटी भरणेला सुरुवात करण्यात आली होती. सकाळ […]

तरुणावर बिबट्याचा हल्ला : मांगवली येथील घटना

वैभववाडी (प्रतिनिधी) मांगवली आयरेवाडी येथील विजय अशोक आयरे या विवाहित तरुणावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान मांगवली आयरेवाडी येथील पुलानजीक घडली. या हल्यात विजय गंभीर जखमी जखमी झाला आहे. त्याच्यावर उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसापूर्वी वैभववाडी शहरात बिबट्या आढळून […]

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिव्यांगांची दोन महिन्यांची पेंशन थकली ; ‘जबाबदार कोण?’ असा संतप्त सवाल होतोय उपस्थित 

  पालकमंत्री नाम. नितेश राणेंकडून तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन ; दिव्यांगांचाही जनता दरबार घेण्याची होतेय मागणी   कणकवली (प्रतिनिधी)   संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना मिळणारी रु. 1500 (आता वाढीव 2500 रुपये) पेंशन ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात बहुतांश लाभार्थ्यांना न मिळाल्याने संताप उसळला आहे. याबाबत शासनस्तरावर चौकशीही करण्यात आली; मात्र लाभार्थ्यांचे बँक खाते व आधार […]