सावंतवाडी _ मळेवाड_मळेवाड शिरसाटवाडी येथील गुरुनाथ बाबुराव शिरसाट (वय 84) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सूना,नातवंडे असा परिवार आहे.गुरुनाथ शिरसाट हे उत्कृष्ट दुचाकी मेकॅनिक म्हणून प्रसिद्ध होते. मळेवाड येथील टेलर वसंत शिरसाट यांचे ते वडील होत.
गुरुनाथ शिरसाट यांच्या एका मुलाचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते.त्यानंतर ते मयत मुलाची पत्नी श्रीमती विनया उर्फ संध्या शिरसाट यांच्या बरोबर राहत होते.श्रीमती शिरसाट यांनी व तीच्या मुलानी गुरुनाथ शिरसाट यांची वृद्धापकाळात सेवा केली.
यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधी वेळी आपण अग्नी देणार असे श्रीमती शिरसाट यांनी भावना व्यक्त करून त्यांनी शिरसाट यांच्या मृतदेहाला अग्नी दिली.श्रीमती संध्या शिरसाट ह्या सातार्डा येथील शाळेत शिक्षका म्हणून कार्यरत आहेत.
