आचरा-अर्जुन बापर्डेकर
सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपले भवितव्य घडविण्यासाठी
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन साध्य करण्यासाठी कठोर मेहनत घेण्याचे आवाहन चिंदर ग्रामोन्नती मंडळ मुंबई चे अध्यक्ष सदाशिव चिंदरकर यांनी भगवती मंदिर चिंदर येथे केले.
भगवती माऊली यात्रोत्सवाच्या औचित्यावर चिंदर गावातील मुलांचा गुणगौरव सोहळा चिंदर ग्रामोन्नती मंडळ मुंबई तर्फे भगवती मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी त्यांच्या सोबत मंडळाचे कार्यवाह आत्माराम नाटेकर, चिंदर उपसरपंच महेंद्र मांजरेकर मंडळाचे खजिनदार शंकर पाताडे,अरुण नाटेकर,केशव पाटील,कृ गो चिंदरकर,बाजेल फर्नांडिस, वेदान्त चिंदरकर,पो.पाटील दिनेश पाताडे,रावजी तावडे,मंदार नाटेकर,कैलास घागरे यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
चिंदर ग्रामपंचायत अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत गुणवंत मुलांचा सत्कार व्याख्यानमाला मार्गदर्शन शिबिर यासारखे अनेक उपक्रम राबवून ग्रामीण भागातील मुलांना योग्य ते मार्गदर्शन देण्याचे कार्य या मंडळातर्फे सुरू आहे .
या मार्गदर्शनाचा अनेक मुलांना चांगला उपयोग झाल्याचे निकालावरून दिसून येत असल्याचे मत प्रमुख कार्यवाहक आत्माराम नाटेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले गोरगरीब मुलांना शैक्षणिक मदत ही या मंडळातर्फे दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
