सांगवे सोसायटी चेअरमनपदी भालचंद्र सावंत यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) सांगवे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी भालचंद्र सावंत यांची निवड करण्यात आली. सोसायटीच्या कार्यालयात मंगळवारी झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. चेअरमनपदी निवड झाल्यानंतर भालचंद्र सावंत यांचे सांगवे सरपंच संजय उर्फ बाबू सावंत यांनी सत्कारपर अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.   सांगवे, कनेडी येथील संस्था कार्यालयात झालेल्या निवडीनंतर भालचंद्र सावंत यांना […]

कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार भगिनींना मंत्री नितेश राणेंची विशेष भेट

  मत्स्यव्यवसाय विभाग उत्तम दर्जाचे ग्लोव्हज वाटणार  ; मच्छी मार्केटमधील दुर्गंधीबाबत ठोस उपाययोजना करणार     नागपूर : कोळंबी सोलताना मच्छिमार महिलांच्या बोटांना होणारा त्रास आणि मासळी बाजारातील अस्वच्छता-दुर्गंधीच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाचे आश्वासन दिले आहे. विधानपरिषदेत लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी कोळंबी सोलणाऱ्या महिलांसाठी विशेष हातमोजे (ग्लोव्हज) उपलब्ध […]

एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ यांना राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

  कणकवली ( प्रतिनिधी) जगप्रसिध्द एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांना कोल्हापूर येथील आढावा महाराष्ट्राचा, लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा *आदर्श उपक्रमशील शिक्षकरत्न* पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा २१ डिसेंबर २०२५ रोजी शाहू स्मारक सभागृह, कोल्हापूर येथे होणार आहे.   सदाशिव पांचाळ हे २००३ पासून शिक्षक नसतानाही शैक्षणिक […]

जि.प. आणि पं.स. वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकविण्यासाठी मोर्चेबांधणी करा- वैभव नाईक

कुडाळ तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न कणकवली (तुळशीदास कुडतरकर) विकासाचे व्हिजन मांडणाऱ्या सत्ताधारी आमदार, खासदार यांनी गेल्या वर्षभरात कुडाळ तालुक्याचा कोणताही विकास केला नाही. याउलट महायुती सरकारकडून शाळा, हायस्कुल बंद पाडल्या जात आहेत. जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळयोजनेचे एकही काम सत्ताधारी आमदार, खासदार पूर्ण करू शकले नाहीत.कुडाळमध्ये रस्ते […]

पालकमंत्री नितेश राणेंची शेतकऱ्यांप्रती वचनपूर्ती ; सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी ४.८६ कोटी मंजूर

  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित रक्कम जमा करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश नागपूर : यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऐन भातकापणीच्या हंगामात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देत लवकरात लवकर भरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भात-नाचणी नुकसानीपोटी जिल्ह्यातील […]

पडेल, देवगड येथे हिवाळी पाहुण्यांचे आगमन ; दुर्मीळ स्थलांतरित बदकांचे दर्शन ; निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता….

देवगड (प्रियांका पाटील)  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील पाणथळ भागात 06 आणि 07 डिसेंबर 2025 रोजी विदेशातून स्थलांतर करून आलेल्या हिवाळी जलपक्ष्यांचे दर्शन झाल्याची नोंद समोर आली आहे. थंड हवामानापासून आश्रय शोधत हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या पक्ष्यांमुळे परिसरातील जैवविविधतेची श्रीमंती पुन्हा अधोरेखित झाली आहे.   स्थानिक पाणथळ पट्ट्यात दिसून आलेल्या प्रमुख प्रजातींमध्ये […]

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर चालत राहणार – मंत्री नितेश राणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कणकवली बुध्दविहार येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण कणकवली(प्रतिनिधी) महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा मिळालेली आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर राहिलेला आहे. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मानव म्हणून जगण्याचा हक्क दिला आहे.आज महापरिनिर्वाण दिनाच्या […]

सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी ५ हजार डिजिटल स्वाक्षऱ्या ; सोशल मिडीयावरील मोहिमेला मोठा प्रतिसाद

सावंतवाडी (प्रतिनिधी)   सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम रखडल्याबद्दल वाढती नाराजी लक्षात घेऊन रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या डिजिटल स्वाक्षरी मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत हजारो नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. दहा वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र दशक उलटूनही टर्मिनसचे काम […]

खरे सौंदर्य हे बाह्य रूपात नसून अंतर्मनात दडलेले असते – संजय वेतुरेकर

  कणकवली (तुळशीदास कुडतरकर) कळसुली शिक्षण संघ मुंबईचे, कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स,कळसुली प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. मंगळवार, दि.२ डिसेंबर, २०२५ रोजी प्रशालेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन स्कूल कमिटी चेअरमन मा. श्री. के. आर. दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे मा. श्री. संजय वेतुरेकर यांच्या उपस्थितीत मोठ्या […]

बर्वे ग्रंथालयाच्या तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत ; प्रज्ञा चव्हाण प्रथम

देवगड (प्रतिनिधी)   देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने ‘मला आवडलेले पुस्तकं ‘ या विषयावर तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यास्पर्धेचे उद्घघाटन देवगड हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री संजीव राऊत याच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी श्री राऊत यांनी स्पर्धकना वाचक स्पर्धेमध्ये भाग […]