बर्वे ग्रंथालयाच्या तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत ; प्रज्ञा चव्हाण प्रथम

देवगड (प्रतिनिधी)

 

देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने ‘मला आवडलेले पुस्तकं ‘ या विषयावर तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यास्पर्धेचे उद्घघाटन देवगड हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री संजीव राऊत याच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

यावेळी श्री राऊत यांनी स्पर्धकना वाचक स्पर्धेमध्ये भाग घेताना स्पर्धकाचे संवाद, देहबोली, पाठांतर, हावभाव याचे महत्त्व विषद केले आणि स्पर्धेचा विषय आकलन करून प्रभावीपणे मांडण्याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर ग्रंथालयाचे सचिव श्री सीताराम पाटील, संचालक सदस्य श्री दत्तात्रय जोशी, श्री महेश खोत तसेच श्री प्रकाश पंडित आणि श्री सागर कर्णिक उपस्थित होते. श्री पाटील यांनी श्री संजीव राऊत याचे तर श्री जोशी यांनी श्री प्रकाश पंडित यांचे स्वागत केले.

या स्पर्धेमध्ये सौ. प्रज्ञा चव्हाण यानी प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय कु. स्नेहा नागरगोजे आणि तृतीय कु. वैभवी परब याना मिळाले. तर उत्तेजनार्थचे गायत्री मेस्त्री आणि अर्चिता कदम याना मिळाले. या स्पर्धेचे श्री संजीव राऊत आणि श्री प्रकाश पंडित यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

यावेळी मान्यवराच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख पारीतोषिके व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री प्रशांत बांदकर यांनी केले आणि सचिव श्री पाटील यांनी मान्यवराचे, स्पर्धकाचे व उपस्थित श्रोत्यांचे आभार मानले. यावेळी ग्रंथालयाचे वाचक वर्ग उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *